For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेचे धार्मिक अन् सामाजिक महत्व काय सांगते? वाचा सविस्तर

11:18 AM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
vat purnima 2025  वटपौर्णिमेचे धार्मिक अन् सामाजिक महत्व काय सांगते  वाचा सविस्तर
Advertisement

वटपौर्णिमा सण धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा 

Advertisement

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमा हा सण भारतातील, विशेषत: महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या सारख्या राज्यांमध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. यामागील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पैलू तसेच या सणाचे ऐतिहासिक मुळेही जाणून महत्वाचे ठरणार आहे.

वटपौर्णिमा हा सण धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. सावित्री-सत्यवान यांच्या कथेतून प्रेरणा घेऊन हा सण स्त्रीच्या निष्ठा, बुद्धिमत्ता आणि धैर्याचे प्रतिक बनला असल्याचे मानले जात आहे. वटवृक्षाची पूजा आणि उपवास यामुळे हा सण पर्यावरण संरक्षण आणि कुटुंबातील नातेसंबंध दृढ करण्याचे कार्य करतो आहे.

Advertisement

आधुनिक काळात या सणाला पर्यावरण जागरूकतेच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. अलीकडच्या काळात या सणाला लैंगिक समानतेच्या दृष्टिकोनातून साजरे केले जाऊ शकते, असा सुर उमटत आहे. वटपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून, भारतीय संस्कृतीचा एक अमूल्य वारसा आहे, जो पिढ्यानपिढ्या टिकवला पाहिजे, असेही जाणकार समाजाला कळकळीने सांगताहेत.

वटवृक्षाचे पावित्र्य

हिंदू धर्माला वटवृक्षाला 'कल्पवृक्ष' असेही म्हणतात. दीर्घायुषी असलेला हा वटवृक्ष पवित्र मानला जातो. वटवृक्षाखाली पूजा केल्याने सौभाग्य, संतती आणि समृद्धी प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. वटवृक्षाला त्रिमूर्तीचेसुद्धा (ब्रह्मा, विष्णू, महेश) प्रतिक मानले जाते.

वट पौर्णिमेला असलेला पौराणिक आधार

वटपौर्णिमेची मुळे महाभारतातील सावित्री-सत्यवान कथेत सापडतात. ही कथा वैदिक आणि पौराणिक काळातून प्रेरित आहे. जिथे निष्ठा आणि तपश्चर्येला विशेष महत्त्व होते.

वट पौर्णिमा आणि आधुनिक काळ

आधुनिक काळात वटपौर्णिमेचे स्वरूप काही प्रमाणात बदलले आहे. शहरी भागात वटवृक्षाची पूजा साध्या पद्धतीने केली जाते. ग्रामीण भागात पारंपरिक ढंग जपत सण साजरा केला जातो.

पर्यावरण जागरूकता

आधुनिक काळात वटपौर्णिमेला पर्यावरण संरक्षणाशी जोडले गेले आहे. अनेक स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणवादी या सणाच्यानिमित्ताने वृक्षारोपण मोहिमा राबवतात.

सामाजिक बदल

काही ठिकाणी वटपौर्णिमेला लैंगिक समानतेच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. सावित्रीच्या कथेला स्त्राr सक्षमीकरणाचे प्रतिक म्हणून प्रोत्साहन दिले जाते. काही आधुनिक जोडपी वटपौर्णिमेला एकमेकांच्या दीर्घायुष्यासाठी आणि परस्पर प्रेमासाठी साजरा करतात.

शहरी भागात वटवृक्षाची उपलब्धता कमी असल्याने पूजा शक्यतो साध्या पद्धतीने केली जाते. असे असले तरी वटपौर्णिमा साजरी करण्यामागील उत्साह पूर्वीसारखाच आजही टिकून आहे. बदलत्या काळानुसार हजारो कुटुंबे उच्चभ्रू श्रेणीत गेले. परंतू त्यांनीही वटपौर्णिमा साजरी करताना त्यातील पारंपरिकता मोडू दिलेली नाही.

पर्यावरण संरक्षणाच्या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी वटवृक्षांचे संवर्धन आणि वृक्षारोपण केले पाहिजे. सामाजिक जागरूकता मोहिमांद्वारे सावित्रीच्या कथेला स्त्राr सक्षमीकरणाशी जोडण्याचा प्रयत्न व्हावा असेही जाणकार मंडळी सांगत आहेत.

सावित्री-सत्यवान कथा

महाभारतातील वनपर्वात सावित्री-सत्यवान यांची कथा सविस्तर सांगितली आहे. सावित्री, एक बुद्धिमान आणि निष्ठावान राजकन्या, हिने सत्यवान या निर्वासित राजपुत्राशी विवाह केला, जरी त्याला फक्त एक वर्षाचे आयुष्य शिल्लक असल्याचे तिला माहित होते.

सत्यवानाचा मृत्यू होण्याच्या दिवशी, सावित्रीने वटवृक्षाखाली उपवास आणि प्रार्थना केली. जेव्हा यमराज सत्यवानाचा प्राण घेऊन गेले, तेव्हा सावित्रीने यमराजाशी युक्तिवाद केला आणि आपल्या बुद्धिमत्तेने व निष्ठेने सत्यवानाचा जीव परत मिळवला. ही कथा स्त्रीच्या निष्ठा, बुद्धिमत्ता आणि पतीप्रेमाचे प्रतिक मानली जाते. वटपौर्णिमा हा सण सावित्रीच्या या कार्याची स्मृती म्हणून साजरा केला जातो.

Advertisement
Tags :

.