महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुरुवार व शुक्रवारी निढोरीतील सुवर्ण गणेश मंदिराचा वास्तुशांती सोहळा

01:14 PM Dec 10, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

मुरगूड प्रतिनिधी

Advertisement

निढोरी, ता. कागल येथे उत्तराभिमुख सुवर्ण गणेश मंदिराचा वास्तुशांती सोहळा येत्या गुरुवार दि. १४ आणि शुक्रवार दि. १५ रोजी होणार असल्याची माहिती संयोजनप्रमुख राजेंद्र आप्पासाहेब सुतार व ओमसाई बहुउद्देशीय कला, क्रीडा व सांस्कृतिक युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. निपाणी -राधानगरी राष्ट्रीय महामार्गालगत उभारल्या गेलेल्या या मंदिरामुळे गावाच्या वैभवात भर पडली आहे. सोन्याची झळाळी असणारे अतिशय सुंदर, नक्षिदार व देखणे मंदिर आदमापूरच्या बाळूमामा निर्थस्थळास भेट देणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांच्या सहजदृष्टीस येणारे आहे.

Advertisement

श्री गणेश मूर्तीची सवाद्य मिरवणूक गुरुवार दि. १४ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वा.धार्मिक वातावरणात गावाच्या मुख्य मार्गावरून काढण्यात येणार आहे. मिरवणुकीचा मार्ग कागल रोड -लक्ष्मी नगर ते ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर मार्गे गावाच्या मुख्य मार्गावरून- सुवर्ण गणेश मंदिर असा असेल. या मिरवणूकीत गावातील विविध तरुण मंडळे, संघटना, परिसरातील भजनी मंडळे व ग्रामस्थ यांनी सहभाग घ्यावा.

शुक्रवार दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वा. श्री मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मंदिराचा कलशारोहण सोहळा श्री संत अमृतानंद महाराज (जंगली महाराज मठ गोरंबे) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच दुपारी १२ नंतर महाप्रसाद वाटप, माहेरवासीनींना ओटी भरणे आणि रात्री ८ पासून रात्रभर सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविक भक्तांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#murgudkolhapur
Next Article