वरुण धवन अन् मृणाल एकत्र झळकणार
कॉमेडी चित्रपटात करणार धमाल
डेव्हिड धवन आणि वरुण धवन चौथ्या चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. या आगामी चित्रपटात अभिनेता वरुण हा दोन अभिनेत्रींसोबत दिसून येणार आहे. याचदरम्यान या चित्रपटातील एका अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. रमेश तौरानी यांच्याकडून हा चित्रपट निर्माण केला जाणार आहे.
या चित्रपटात मृणाल ठाकूर झळकणार आहे. पहिल्यांदाच वरुण आणि मृणाल ही जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. डेव्हिड धवन यांच्यासोबत मृणालने पटकथेविषयी चर्चा केली असल्याचे समजते. मे किंवा जून महिन्यात याचे चित्रिकरण सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.
दुसऱ्या अभिनेत्रीचे नाव लवकरच ठरविले जाणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण भारतासह अनेक देशांमध्ये केले जाणार आहे. तीन मुख्य व्यक्तिरेखांसोबत चित्रपटात अनेक अनुभवी विनोदी कलाकार असणार आहेत. अद्याप या चित्रपटाचे नाव घोषित करण्यात आलेले नाही.
वरुण धवन लवकरच समांथा रुथ प्रभूसोबत राज निदिमोरु आणि कृष्णा डीके यांच्या ‘सिटाडेल’मध्ये दिसून येणार आहे. याचबरोबर कीर्ति सुरेश आणि वामिका गब्बीसोबत ‘बेबी जॉन’ या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती एटली आणि मुराद खेतानी यांनी केली आहे.