For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सलमान खान-शिल्पा शेट्टी ना हायकोर्टाचा दिलासा

12:32 PM Nov 22, 2024 IST | Pooja Marathe
सलमान खान शिल्पा शेट्टी ना हायकोर्टाचा दिलासा
High Court gives relief to Salman Khan-Shilpa Shetty
Advertisement

एससी-एसटी कायद्यांतर्गत नोंदविण्यात आलेला एफआयार रद्द

Advertisement

मुंबईः

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना राजस्थान उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सलमान आणि शिल्पा शेट्टी यांच्या विरुद्ध २०१७ मध्ये एससी-एसटी कायद्यांतर्गत चुरू कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१३ साली एका शो मध्ये भंगी हा शब्द वापरल्यामुळे हा एफआयआर दाखल केलेला होता. हा एफआयआर हायकोर्टाने रद्द केला. या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरूण मोंगा यांच्या न्यायालयात झाली.

Advertisement

कलम आणि चौकशीशिवाय एससी-एसटी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवता येणार नाही. 'भंगी' हा शब्द जात नाही किंवा तो जातीचा शब्दही नाही. उलट, हा एक अपशब्द आहे, असे न्यायमूर्ती मोंगा यांनी निर्णयात म्हटले आहे. हा शब्द कोणालाही कमी लेखण्यासाठी संबोधला गेला नसून स्वतःला कमी लेखण्यासाठी संबोधला होता, असा युक्तीवाद शिल्पा शेट्टीचे वकील प्रशांत पाटील यांनी केला. दुसरीकडे याचिकाकर्त्यांची बाजू शक्ती पांडे आणि गोपाल सांदू यांनी मांडली.

काय आहे नेमकं प्रकरण ?

सलमान खानचा " टायगर जिंदा है " चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्या दरम्यान सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांनी वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे अपमानास्पद शब्द उघडपणे वापरताना ऐकले होते. त्यांचे हे वक्तव्य अपमानास्पद असल्याचे म्हटले गेले, त्यांनी दोन्ही कलाकारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आल होती. याप्रकरणी अशोक पनवार यांनी आयपीसी कलम १५३ ए (धर्म, वंश इत्यादींच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अंतर्गत चुरू पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर १८ जानेवारी २०१८ रोजी तपास अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली होती.

Advertisement
Tags :

.