Solapur : तिरुपतीच्या पद्मावतीदेवी ब्रह्मोत्सवमध्ये सोलापूरची वारकरी दिंडी!
तिरुचनूर पद्मावतीदेवी ब्रह्मोत्सवात सोलापुरी वारकऱ्यांची दिंडी दिमाखात
सोलापूर : तिरुपतीमधील तिरुचनूर येथे असलेल्या श्री पद्मावतीदेवी देवस्थानच्या ब्रह्मोत्सवमध्ये सोलापूरच्या वारकरी दिंडीने सहभाग नोंदविला. ब्रह्मोत्सवमध्ये प्रथमच सोलापुरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्था व श्री सिद्धारूढ सांस्कृतिक सेवा भजनी मंडळ यांचा वारकरी दिंडी सोहळा झाला.
अखिल भाविक वारकरी मंडळ प्रदेश अध्यक्ष व उत्कृष्ट मुदंग वादक ह.भ.प. ज्योतीराम महाराज चांगभले व सोलापुरातील सुप्रसिद्ध गायक ह. म.प. लक्ष्मण महाराज देविदास यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले होते. महाराष्ट ही संताची भूमी आहे व सोलापूर जिल्ह्यात भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे मंदिर आहे. म्हणून सोलापुरातील या मंडळाला मान मिळाला.
या वारकरी दिंडीमध्ये वारकरी पाऊल, फुगडी काटवट असे विविध वारकरी खेळ सादर करून सांस्कृतिक व पारंपारिक वारकरी खेळाची परंपरा जोपासली. ह.भ.प लक्ष्मण महाराज देविदास यांनी तेलुगू गीते गाऊन आपली सेवा दिली. या कार्यक्रमासाठी सोलापूरचे माजी महापौर जनार्दन कारमपुरी यांचे सहकार्य लामले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुराधा देविदास, धीरज देविदास, राकेश देविदास, प्रणिती चांगभले, कौस्तुभ चांगभले, वर्षांराणी चांगभले, अजय मोरे, कुमार गायकवाड, सोमनाथ कोरे, धनाजी लोहार, शरयू जगताप, ओम माशाळ, वैष्णवी माशाळ, शहाबाई जगताप, यशांक सुरवसे, दक्ष वारे, गणेश शेटे, श्रेयस सुरवसे, कृष्णा वाघमोडे, आदित्य इंगळे, वेदांत ठाकर, समर्थ जगताप यांनी परिश्रम घेतले.