जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी विविध कामे हाती
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाचा विकास करण्यात येत आहे. त्यानुसार विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय समोरील बाजूस असणारे कठडे व लोखंडी जाळी हटविण्यात येत असून त्याठिकाणी बांधकाम करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरील फुटपाथ बाजूस असणारा कठडाही हटविण्यात आला असून तेथेही सीसी बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे नूतनीकरण वेगाने करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अनेक कंत्राटदारांच्या माध्यमातून विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. कार्यालयासह आवारातही विविध कामे करण्यात येत आहेत. एकाच छताखाली नागरिकांना विविध सरकारी सुविधांचा लाभ घेता यावा, या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरण करण्यात येत आहे. कामे जलदगतीने करण्यात येत आहेत.