For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

10:18 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
Advertisement

भाजपला जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन : 8 रोजी जाहीर बैठक

Advertisement

खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी भाजपच्या पदाधिकारी आणि महाशक्ती प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख, बुथ कमिटी यासह सर्व मोर्चांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येथील देसाई फॉर्महाऊसवर पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संजय कुबल होते. यावेळी प्रधान कार्यदर्शी बसवराज सानिकोप यांनी उपस्थितांचे स्वागत करून होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात नियोजन करण्यासाठी सूचना मांडाव्यात, तसेच बुथ आणि ग्रामीण पातळीवर मतदान करून घेण्यासाठी नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी खानापूर तालुका मतदारसंघाचे प्रभारी महेश मोहीते यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या बैठकीत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन केले. यावेळी प्रमोद कोचेरी, अरविंद पाटील, अध्यक्ष संजय कुबल यांची भाषणे झाली. सोमवार दि. 8 रोजी शुभम गार्डन येथे पदाधिकाऱ्यांची जाहीर बैठक बोलावून सविस्तर मार्गदर्शन करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी जोतिबा रेमाणी, मल्लाप्पा मारीहाळ, सुरेश देसाई, बाबुराव देसाई, वसंत देसाई, किरण यळळूरकर, मारुती हिरेमठ, सदानंद पाटील, विजय कामत, प्रकाश अंबोजी, चांगाप्पा निलजकर, अशोक देसाई यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.