महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंगा

11:53 AM Nov 04, 2022 IST | Rohit Salunke
Advertisement

बेळगाव - विठू नामाचा गजर करत टाळ मृदुंगांच्या गजरात डोईवर तुळशी वृंदावन मुखात हरी नामाचे बोल आणि पंढरीची वाट धरणाऱ्या हजारो वारकरी बांधवांसाठी आजचा कार्तिकी एकादशीचा पवित्र दिवस एकादशीनिमित्त वडगाव बाजार गल्ली विठ्ठल देव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
आज वडगाव बाजार गल्ली येथील विठ्ठल मंदिरात सफरचंदाची आरास करून सजावट करण्यात आली आहे. भाविकांना ही आरास आकर्षित करत असून वडगाव विठ्ठल मंदिरात सकाळपासून विठुरायाचे नामस्मरण करत भाविकांनी गर्दी केली आहे. पहाटे काकड आरतीने कार्तिकी एकादशीला प्रारंभ करण्यात आला. पूजा अभिषेक भजन व कीर्तनाचे आयोजन एकादशी निमित्त आज मंदिरात करण्यात आले आहे.
आज अनेक भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी करताना पाहायला मिळत आहेत .

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#KartikiEkadashi#socailmedia#tarunbharat#Vadgaon Bazar Galli#Vitthal Dev Temple
Next Article