For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यात 7 मे रोजी आठवडी बाजार-यात्रांवर निर्बंध

10:56 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्यात 7 मे रोजी आठवडी बाजार यात्रांवर निर्बंध
Advertisement

जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांचा आदेश

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकांसाठी दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघासह कारवार लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कित्तूर आणि खानापूर तालुक्यातील आठवडी बाजार व यात्रा-जत्रांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सदर आदेश जारी केला आहे. जिल्ह्यामध्ये दि. 7 मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यात आठवडी बाजार भरविले जातात. तसेच काही ठिकाणी यात्राही असून या दरम्यान मतदान कार्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी दि. 7 मे रोजी भरविले जाणारे आठवडी बाजार व यात्रांवर निर्बंध घालण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघ

Advertisement

बेळगाव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या बेळगाव तालुक्यातील उचगाव-मळेकरणी यात्रा, खानापूर तालुक्यातील इटगी, हुक्केरी तालुक्यातील बुगटेआलूर, हिटणी, अंमनगी, सोलापूर, बेल्लदबागेवाडी, यमकनमर्डी, पाच्छापूर येथील आठवडी बाजार, मुडलगी तालुक्यातील धर्मट्टी, तुक्कानट्टी, सुनधोळी, बेळकुंदी, गोकाक तालुक्यातील खणगाव येथील आठवडी बाजार, कित्तूर तालुक्यातील मत्तीकोप्प, नागनूर, पट्टीहाळ के. एच. येथील यात्रा, बैलहोंगल तालुक्यातील बेळवडी, चचडी, यकुंडी येथील आठवडी बाजार, हिरेकोप्प यात्रा, रामदुर्ग तालुक्यातील नागनूर, होसूर येथील यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत.

चिकोडी लोकसभा मतदारसंघ

चिकोडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या निपाणी तालुक्यातील सौंदलगा, हंचनाळ के. एस., बारवाड, बेडकिहाळ, चिकोडी-सदलगा येथील एकसंबा, शिरगांव, चंदूर, इंगळी, अथणी तालुक्यातील मसरगुप्पी, शंकरहट्टी, तेलसंग, नंदेश्वर, रे•ाrहट्टी, कोहळ्ळी, बन्नूर, यकंची, कागवाड तालुक्यातील मलबार, अजूर, कृष्णाकित्तूर, शेडबाळ, मंगसुळी, कुडची तालुक्यातील सवसुद्दी, अळगवाडी, निलजी, रायबाग तालुक्यातील बंबनाळ, मेखळी, नसलापूर येथील यात्रा-जत्रा व आठवडी बाजार भरविण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.