महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीराम मूर्तिप्रतिष्ठापनेनिमित्त सांगे परिसरात रंगले विविध कार्यक्रम

11:45 AM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सांगे : अयोध्येत झालेल्या श्रीराम मूर्तिप्रतिष्ठापनेनिमित्त सांगे मतदारसंघातील सर्व मंदिरांमध्ये श्रीरामाचे सामूहिक पूजन, दीपोत्सव, शोभायात्रा, कीर्तन, रामनाम जप, भजन, महाआरती, तीर्थप्रसाद असे कार्यक्रम झाले. सांगे शहरासह संपूर्ण मतदारसंघात जल्लोषी माहोल राहिला. महिला, पुरुष, बालगोपाळ, वृद्ध असे सारे राममय झाले होते. घरासमोर रांगोळी, पताका, गुढी उभारण्यात आली होती. रात्री दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. बहुतेक कार्यक्रमांना सांगेचे आमदार आणि समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी भगवे सोहळे नेसून उपस्थिती लावली. त्यांनी महाआरती केल्या. यावेळी लोकांनी रामनामाचा जप करत ‘जय श्रीराम’ म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सरकारने सुट्टी दिलेली असल्याने गावागावात लोकांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमांना उपस्थिती लावली. मंत्री फळदेसाई यांनी सांगे, उगे, केपे, वालकिणी, रिवण आदी ठिकाणी स्वत: उपस्थित राहून पूजन केले. सांगे येथे मोठा पडदा लावण्यात आल्याने रामभक्तांनी एकत्र बसून श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद लुटला. उगे येथील मंदिरात पूजन व अन्य कार्यक्रम पार पडले. वालकिणी येथील श्री कणेरीसिद्ध मंदिराजवळ कार्यक्रम झाला. भाटी येथील श्री मल्लिकार्जुन देवालय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. तसेच कीर्तन पार पडले. यावेळी माजी आमदार वासुदेव मेंग गावकर उपस्थित होते. वाडे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे रामनाम जपाचे आयोजन करण्यात आले तसेच भव्य मिरवणूक काढण्यात आली. बांधवाडा, नेत्रावळी येथेही शोभयात्रा काढण्यात आली. नेत्रावळी येथील कार्यक्रमात कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.

Advertisement

सांगे पोलिसांनीही दर्शविला आनंदोत्सवात सहभाग

Advertisement

संपूर्ण देशाने अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा आनंद लुटला. सांगेत पोलिसांनीही आपल्या वाहनावर प्रभू श्रीरामाची प्रतिमा असलेला भगवा ध्वज लावून आपला आनंद व्यक्त केला. सांगे बसस्थानकावर श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमस्थळी भगवा ध्वज लावलेली ही पोलीस गाडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article