रामलिंग देवस्थान तुरमुरी येथे विविध कार्यक्रम
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी महाप्रसादाचे आयोजन
वार्ताहर/उचगाव
रामलिंग देवस्थान तुरमुरी येथे शेवटच्या श्रावण सोमवारी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रम पार पडले. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी सालाबादप्रमाणे यावर्षीही परव (महाप्रसाद)कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवानिमित्त सोमवारी या रामलिंग देवस्थानच्या परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन पहाटे पाच वाजल्यापासूनच सुरू होते. या सर्व कार्यक्रमांचा सांगता समारंभात ग्रा. पं. माजी अध्यक्ष नागनाथ जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुरमुरी ग्रामपंचायतचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव होते. यावेळी श्रीहरी सोसायटीचे चेअरमन यल्लाप्पा जाधव, नामदेव मेघोचे, भरमा कलभंट, उमेश जाधव ,बाळू खांडेकर, यल्लापा बेळगुंदकर, पुन्नाप्पा जाधव, यल्लाप्पा तंगनकर, सुनील बांडगे, सदबा जाधव, रामलिंग गडकरी, आप्पाण्णा खांडेकर यासह गावातील प्रमुख मान्यवर मंडळी उपस्थित होती. मुख्याध्यापक प्रकाश चलवेटकर यांनी स्वागत केले. यानिमित्त गावातील ज्ञानेश्वर भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रमही या ठिकाणी सादर करण्यात आला.