For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ड्युरँड चषक स्पर्धेतील विविध पुरस्कार विजेते

01:39 AM Aug 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
ड्युरँड चषक स्पर्धेतील विविध पुरस्कार विजेते
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

येथे शनिवारी झालेल्या 134 व्या ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी संघाने सलग दुसऱ्यांदा राखले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेडने डायमंड हार्बरचा 6-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. 1991 नंतर ड्युरँड चषक सलग दोन वेळा जिंकणारा ईस्ट बंगालनंतर नॉर्थ ईस्ट युनायटेड हा दुसरा संघ आहे.

या स्पर्धेतील विविध विजेते पुढीलप्रमाणे, अलाएद्दीन अजारेइ - गोल्डन बॉलचा मानकरी. या स्पर्धेमध्ये अजारेइने एकूण 8 गोल केले आहेत. मोरोक्कोच्या अलाएद्दीन अजारेइने या स्पर्धेत एकूण 8 गोल नोंदविले असून त्याने मॅजेसेन आणि कोलाको यांना मागे टाकले आहे. मॅजसेन आणि लिस्टन कुलासो यांनी आतापर्यंत प्रत्येकी 5 गोल नोंदविले आहेत. या स्पर्धेमध्ये नॉर्थ ईस्ट युनायटेडचा गोलरक्षक गुरुमीत सिंग हा सर्वोत्तम गोलरक्षक ठरला असून तो गोल्डन ग्लोव्हचा मानकरी ठरला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.