For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangali Rain Update: वारणा नदीवरील आरळा, चरण, रेठरे, बिळाशी पूल पाण्याखाली

01:29 PM Aug 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
sangali rain update  वारणा नदीवरील आरळा  चरण  रेठरे  बिळाशी पूल पाण्याखाली
Advertisement

पुनरावृत्ती झाल्यास याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता

Advertisement

कोकरुड : शिराळा पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरु असून आरळा, चरण, रेठरे, बिळाशी हे प्रमुख चार पुल पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. तसेच नदीकाठची शेकडो एकरमधील पिके पाण्याखाली गेल्याने वारणेची वाटचाल पुन्हा २०२१ च्या महापुराकडे चालल्याचे दिसून येत आहे. पुनरावृत्ती झाल्यास याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

वारणा धरणातून दुपारी एक वाजता वक्र द्वाराद्वारे सुरू असणारा 38,350 क्युसेक्स विसर्ग कमी करून तो 32,627 क्युसेक करण्यात आला आहे. विद्युत गृहातून 1630 क्युसेक असा एकूण 34,257 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पाऊस वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याचे धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे.

Advertisement

आमदार सत्यजित देशमुख, तहसिलदार शामला खोत, डी. वाय. एस. पी अरुण पाटील, सपोनी जयवंत जाधव, मनसे तालुका अध्यक्ष संजय पाटील यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. लोकांनी सुरक्षित राहून काळजी घ्यावी तसेच सर्वांनी सतर्क रहावे. या परिस्थितीत प्रशासनाचा आवश्यक ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार शामला खोत यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.