कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वनिता विद्यालय शाळेचे पालक पुन्हा आक्रमक

11:41 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गटशिक्षणाधिकाऱ्यांची घेतली भेट : फी वाढीसंदर्भात चर्चा

Advertisement

बेळगाव : क्लब रोड येथील वनिता विद्यालय इंग्लिश मीडियम शाळेचे पालक फी वाढीसंदर्भात पुन्हा आक्रमक झाले. मंगळवारी पालकांनी बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांची भेट घेऊन फी वाढीसंदर्भात शाळा प्रशासनासोबत संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली. त्याचबरोबर पुढील फी वाढीसंदर्भात प्राचार्य व व्यवस्थापन मंडळाला सूचना करण्याची मागणी केली. वनिता विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या व्यवस्थापनाने 2025-26 च्या शैक्षणिक वर्षात अचानकपणे 5 हजार रुपयांनी फी वाढ केली. या विरोधात 10 एप्रिल रोजी पालकांनी शाळेसमोरच संताप व्यक्त केला. तसेच प्राचार्यांना जाब विचारला यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला.

Advertisement

मोठे डोनेशन देऊन देखील पुन्हा अचानक फी वाढ केली जात असल्याने पालकांनी रोष व्यक्त केला. पालकांच्या आक्रोशानंतर व्यवस्थापन मंडळाने यावर्षीची काही प्रमाणात फी वाढ कमी केली. परंतु पुढील वर्षी पुन्हा फी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत प्राचार्यांना विचारले असता त्यांनी योग्य प्रकारे उत्तर दिले नाही. तसेच व्यवस्थापन मंडळही पालकांसोबत बैठकीला येत नसल्याने पालक वर्गातून नाराजी होत आहे. मंगळवारी विश्व़ेश्वरय्यानगर येथील शहर गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठत पालकांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांच्यासमोर शाळेत सुरू असलेल्या प्राचार्यांच्या कारभाराची माहिती दिली. आपण यासंदर्भात चौकशी करू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पालक उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article