वनिता,भातकांडे व सेंट पॉल्स उपांत्य फेरीत
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित 34 व्या दासाप्पा शानभाग चषक 16 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात वनिता विद्यालय, भातकांडे व सेंट पॉल्स शालेय संघानी शानदार विजय नेंदवित उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. ऐश्वर्या महाडिक, सिद्धार्थ करडी, मिर मिरजी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
पहिल्या अटीतटीच्या लढतीत वनिता विद्यालय शालेय संघाने बिल्ला इंटरनॅशनल शालेय संघाचा केवळ पाच धावांनी पराभव केला प्रथम फलंदाजी करताना वनिता विद्यालय संघाने 17.2 षटकात सर्व बाद 71 धावा केल्या. समर्थ पन्हाळे 5 चौकारांसह 29 धावा केल्या. बिर्ला इंटरनॅशनलतर्फे मीत पटेल 4, अथर्व बाळेकुंद्री 3, आयुष होसकोटेने 2 गडी बाद केले. 72 धावांचा पाठलाग करताना बिर्ला इंटरनॅशनल शाळेचा डाव 13.5 षटकात 66 धावातच आटोपला. नरेंद्र सनदी 3 चौकारांसह 17, नयन नंजनावर 14 धावा केल्या. वनिता विद्यालय संघातर्फे ऐश्वर्या महाडिकने 28 धावात 5 गडी बाद केले. समर्थ पन्हाळे यांनी दोन गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात सेंट पॉल्स संघाने केएलई इंटरनॅशनलचा 6 गड्यांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केएलई इंटरनॅशनल संघाने 23.5 षटकात सर्व बाद 111 धावा केल्या. युग शहा 2 चौकारांसह 26, अतिथी भोगण 2 चौकारांसह नाबाद 24 धावा केल्या. सेंट पॉल्स तर्फे कनिष्क वेर्णेकर, सिद्धार्थ करडी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सेंट पॉल्स संघाने 18.3 षटकात 4 बाद 112 धावा जमवत हा सामना जिंकला. सिद्धार्थ करडी 3 चौकारांसह 43, साईराज साळुंखे 24 धावा केल्या. केएलईतर्फे कलश बेनकटी व आऊष कुलकर्णी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सेंट पॉल्स संघाने ज्ञान प्रबोधन मंदिर संघाचा 8 गड्यानी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना ज्ञान प्रबोधन मंदिर संघाने 24.2 षटकात सर्व बाद 158 धावा केल्या. आयुष सरदेसाई 4 चौकारांसह 49, पार्थ उचगावकर 33, इंद्रनील नलवडे 17 धावा केल्या. सेंट पॉल्सतर्फे समर्थ करडी 3, सुरज सक्री 2, स्वरूप साळुंखे याने एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सेंट पॉल्स संघाने 22.2 षटकात 2 गडी बाद 161 धावा जमवत आरामात विजय मिळवला. सिद्धांत करडीने 12 चौकारांसह नाबाद 88, स्वरूप साळुंखेने एक षटकार 4 चौकारांसह नाबाद 38 धावा केल्या. ज्ञान प्रबोधनतर्फे सुजल गोरल व योगीराज तेंडुलकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
भातकांडे संघाने लव्हडेल संघाचा 37 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठले. प्रथम फलंदाजी करताना भातकांडे संघाने 25 षटकात 8 गडी बाद 132 धावा केल्या. शाहऊख धारवाडकर 8 चौकारांसह 53, मिर मिरजीने 4 चौकारांसह 20 धावा केल्या. लव्ह डेलतर्फे निश्चल हिरेमठ, अमोघ पाटील, अथर्व यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल लव्हडेल संघाचा डाव 21.2 षटकात 95 धावात आटोपला. अजय लमानी 3 चौकारांसह 42, भिमगवडा पाटील 16 धावा केल्या. भातकांडे शालेयतर्फे मीर मिरजीने 3, स्वयं मोरेने 2 गडी बाद केले.