For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीत ई-सेवा केंद्राची एका व्यक्तीकडून तोडफोड

04:15 PM Dec 27, 2023 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीत ई सेवा केंद्राची एका व्यक्तीकडून तोडफोड
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील मच्छी मार्केट येथील चेतन कम्युनेशन या महा-ई-सेवा केंद्रातील लॅपटॉप संगणक याची बुधवारी साडेतीन वाजता एका व्यक्तीकडून नासधूस करण्यात आली आहे. यासंदर्भात या महा-ई-सेवा केंद्राचे चालक श्रेयस मुंज यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी धाव घेतली आहे. केंद्रात महिला कर्मचारी काम करत होत्या . केंद्राच्या ठिकाणी एक व्यक्ती आली. भांडण करून त्याने संगणक ,लॅपटॉप ,यांची तोडफोड केली. पोलीस तपासानंतर या संदर्भात नेमकी माहिती उघड होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.