For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यात 9 ठिकाणी वन-धन विकास केंद्रे

11:16 AM Sep 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्यात 9 ठिकाणी वन धन विकास केंद्रे
Advertisement

जि. पं. संजीवनी योजनेंतर्गत उपक्रम, विशिष्ट पिकाच्या उत्पादनातून रोजगार

Advertisement

बेळगाव : जिल्हा पंचायतीच्या जीवनोपाय आणि महिला सबलीकरण विभागातर्फे संजीवनी योजनेंतर्गत 7 तालुक्यांमध्ये तालुका निहाय उत्पादित केल्या जाणाऱ्या पिकांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. यासाठी जि. पं. च्या संजीवनी योजनेंतर्गत 9 ठिकाणी वन-धन विकास केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. त्यानुसार संबंधितांना प्रशिक्षण देऊन प्रोत्साहन देत आहेत.

जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यात विविध प्रकारची पिके घेतली जातात. त्यानुसार तालुकानिहाय पिकांचे उत्पादन घेऊन प्रोत्साहन देण्यात येत आहे. तर वन-धन विकास केंद्राच्या माध्यमातून उत्पादकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामीण भागातील जनतेला रोजगाराचे साधन मिळवून दिले जात आहे. जिल्ह्यातील अथणी, बैलहोंगल, बेळगाव, चिकोडी, हुक्केरी, खानापूर, गोकाक, सौंदत्ती या तालुक्यांमध्ये

Advertisement

वन-धन विकास केंद्राच्या माध्यमातून पिकांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जि. पं. कडून तालुका निहाय सर्वेक्षण करून कोणत्या पिकाला कोणत्या तालुक्यात पूरक वातावरण आहे, याचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित तालुक्यात वन-धन विकास केंद्र निर्माण करून देऊन त्याठिकाणी संबंधित पिकांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील 9 ठिकाणी 8 तालुक्यांमध्ये वन-धन विकास केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे.

Advertisement
Tags :

.