वैष्णौदेवीच्या रोप वे प्रकल्पांवरून वाद कायम
आंदोलन कर्त्यांच्या नेत्यांना अटक
जम्मू आणि काश्मीर
येथील रियासी जिल्ह्यातील मजूर आणि दुकानदारांच्या प्रतिनिधींनी कटरा बेस कॅम्पवर वैष्णोदेवी मंदिराच्या पायी मार्गाजवळील प्रस्तावित रोपवे प्रकल्पाच्या विरोधात निदर्शने केली होती. त्यांना निदर्शनानंतर त्यांच्या दोन प्रतिनिधींना करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कटरा येथे झालेल्या हिंसक निदर्शनांच्या एका दिवसानंतर मंगळवारी आठ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली होती, यावेळी एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता.
भूपिंदर सिंग आणि सोहन चंद यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी प्रस्तावित रोपवे प्रकल्पाविरोधात रॅली काढली.
प्रशासनाने आंदोलकांकडून पंधरा डिसेंबरपर्यंतचा वेळ मागून घेतला होता. तरी येथे आज निदर्शने झाल्यामुळे पोलिसांनी दोन संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलिसांनी निदर्शकांना पुढे जाण्यापासून रोखले, परिणामी त्यांच्यात संघर्ष झाला.