वैष्णवी, स्वाती, दिव्या युनिव्हर्सिटी ब्ल्यु
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
विजापूर येथे बीएलडीई महाविद्यालय आयोजित ए. एस. पाटील कॉलेज ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित केलेल्या बॅटमिंटन स्पर्धेत वैष्णवी वेर्लेकर, स्वाती शिरापूर व दिव्या कलादगी यांनी राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी ब्ल्यु हा मानाचा किताब पटकविला.
बीएलडीई असोसिएशन ए. एस. पाटील महाविद्यालय विजापूर आयोजित आंतर महाविद्यालयीन महिलांच्या बॅटमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत लिंगराज महाविद्यालयाची वैष्णवी वेर्लेकर, स्वामी शिरापूर व दिव्या कलादगी यांच्या संघाने महिलांच्या गटात विजेतेपद पटकाविले.
उपांत्यफेरीत लिंगराज महाविद्यालयाने तुंगल महाविद्यालय जमखंडीचा 2-0 असा पराभव केला. तर अंतिम सामन्यात लिंगराजने शिवानंद कागवाड, महाविद्यालयाचा 2-1 अशा गेममध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले. युनिव्हर्सिटी ब्ल्यु सिलेक्शनसाठी घेण्यात आलेल्या सामन्यातून वैष्णवी वि.वि. अश्विनीचा 21-9, वैष्णवी वि.वि. वैष्णवी एस. 21-10, दिव्या वि. वि. दीपा 21-18, दिव्या वि.वि. सृष्टी 21-15, स्वाती शिरापूर वि. वि. श्रध्दा 21-13, स्वाती वि. वि. संपदा 21-14 अशा गेममध्ये पराभव करुन विजेतेपद पटकावित युनिव्हर्सिटी ब्ल्यु हा किताब पटकाविला. या तिन्ही बॅटमिंटनपटूंची निवड झाली असून साऊथ झोन बॅटमिंटन स्पर्धेसाठी आरसीयु विद्यापीठतर्फे या खेळाडू जाणार आहेत. या तिघींना बॅटमिंटन प्रशिक्षक भूषण अणवेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहेत.