कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वैभव सूर्यवंशीचे तुफानी शतक

06:32 AM Nov 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

42 चेंडूत 144 धावा, भारत अ चा अमिरातवर एकतर्फी विजय, जितेश शर्माच्या 32 चेंडूत नाबाद 83 धावा, गुरजपनीत सिंगचे 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ दोहा

Advertisement

भारताचा किशोरवयीन फलंदाज वैभव सूर्यवंशीने आशिया चषक रायझिंग स्टार्स टी-20 क्रिकेट स्पर्धेत आणखी एक तुफानी शतकी खेळी करीत भारतातर्फे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान शतक नोंदवले. संयुक्त अरब अमिरातविरुद्धच्या या सामन्यात त्याने केवळ 42 चेंडूत 144 धावांची तुफानी खेळी करताना 11 चौकार आणि 15 षटकारांची आतषबाजी केली. त्याने केवळ 32 चेंडूत शतक पूर्ण केले. भारताने या सामन्यात 148 धावांनी दणदणीत विजय मिळविला.

प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर 14 वर्षीय सूर्यवंशीने प्रारंभापासूनच जोरदार फटकेबाजी सुरू केली. तो बाद झाल्यानंतर कर्णधार जितेश शर्मानेही फटकेबाजी करीत 32 चेंडूत नाबाद 83 धावा झोडपल्या. या बळावर भारताने 20 षटकांत  4 बाद 297 धावा जमविल्या. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातने 20 षटकांत 7 बाद 149 धावा जमविल्या. गुरजपनीत सिंगने 18 धावांत 3 बळी टिपले. अमिरातच्या शोएब खानने 41 चेंडूत सर्वाधिक 63 धावा जमविल्या.

हा सामना खऱ्या अर्थाने गाजविला तो वैभव सूर्यवंशीने. त्याने आपले शतक 32 चेंडूत पूर्ण करीत रिषभ पंतच्या विक्रमाशी बरोबरी केली. पंतने 2018 मध्ये दिल्लीकडून खेळताना हिमाचलविरुद्ध हा विक्रम केला होता. त्याने नमन धीरसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 168 धावांची भागीदारी केली. नमनने 34 धावा केल्या. राष्ट्रीय संघाकडून आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना शतक नोंदवणाचा वैभव हा सर्वात तरुण फलंदाज बनला आहे.

अभिषेक, उर्वीचा विक्रम अबाधित

मात्र वैभवला अभिषेक शर्मा व उर्वी पटेल यांचा भारतातर्फे सर्वात वेगवान शतक नोंदवण्याचा विक्रम मोडता आला नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अभिषेक व उर्वी पटेल यांनी 2024-25 या मोसमात 28 चेंडूत टी-20 मध्ये शतक नोंदवले आहे. वैभवने हर्षित कौशिकने टाकलेल्या 11 व्या षटकात 4 षटकार व एक चौकार ठोकत 30 धावा वसूल केल्या. मोहम्मद फराजुद्दिनने त्याला बाद केले त्यावेळी भारताची स्थिती 12.3 षटकांत 3 बाद 195 अशी होती. तो बाद झाल्यानंतर धावगती थोडीशी मंदावली होती. पण जितेश शर्माने फटकेबाजी करीत अर्धशतक नोंदवले. त्याने 24 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. नंतर त्याने अरफानला 19 व्या षटकात 3 षटकार, 2 चौकार ठोकत 28 धावा तडकावल्याने भारताला तीनशेच्या जवळपास मजल मारता आली.

अमिरातला हे आव्हान पेलवणारे नव्हतेच. शोएब खान (63 धावा) वगळता अन्य फलंदाजांना भरीव योगदान देता आले नाही आणि निर्धारित षटकांत 7 बाद 149 धावांवर भारताने एकतर्फी मोठा विजय साकार केला. हर्ष दुबेनेही 2 बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक : भारत अ 20 षटकांत 4 बाद 297 : वैभव सूर्यवंशी 42 चेंडूत 11 चौकार, 15 षटकारांसह 144, प्रियांश आर्य 10, नमन धीर 23 चेंडूत 34, जितेश शर्मा 32 चेंडूत 8 चौकार, 6 षटकारांसह नाबाद 83, नेहल वढेरा 14. संयुक्त अरब अमिरात 20 षटकांत 7 बाद 149 : शोएब खान 41 चेंडूत 63, मुहम्मद अरफान 26, अवांतर 15. गुरजपनीत सिंग 3-18, हर्ष दुबे 2-12.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article