For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वैभव नाईकांच्या विजयासाठी पत्नी स्नेहा नाईक उतरल्या प्रचारात

05:05 PM Nov 15, 2024 IST | अनुजा कुडतरकर
वैभव नाईकांच्या विजयासाठी पत्नी स्नेहा नाईक उतरल्या प्रचारात
Advertisement

गवंडीवाड्यात जोरदार शक्तिप्रदर्शन ; नाईकांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा निर्धार

Advertisement

मालवण: प्रतिनिधी

महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या विजयासाठी त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक या प्रचारात उतरल्या आहेत. आज शहरातील गवंडीवाडा प्रभागात त्यांच्या उपस्थितीत ठाकरे शिवसेनेच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. यावेळी 'वैभव नाईक तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा देण्यात आल्या.विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ शहरातील विविध प्रभागात प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे. यात विविध प्रभागात वैभव नाईक यांना वाढता प्रतिसाद मिळत असून या निवडणुकीत त्यांना शहरातून मोठे मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास युवासेनेचे तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांनी व्यक्त केला आहे.
आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारात आता त्याच्या पत्नी स्नेहा नाईक याही उतरल्या असून त्याही मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेत आहेत. यात आज त्यांनी शहरातील गवंडीवाडा प्रभागात ठाकरे शिवसेना, युवासेनेच्या माध्यमातून घरोघरी सुरू असलेल्या प्रचारात सहभाग घेतला. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. गवंडीवाडा प्रभाग हा शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाच्या पाठीशी कायम राहिला आहे. यावेळच्या निवडणुकीतही या प्रभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांना मोठे मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मंदार ओरसकर, रवींद्र तळाशीलकर, संतोष शिरगावकर, बाळू अंधारी, जेम्स फर्नांडिस, आगोस्तीन डिसोझा, पल्लवी तारी, श्रीकृष्ण तळवडेकर, प्रमोद कांडरकर, बाबू डायस, अँथोनी डिसोझा, संतोष देसाई, हेमंत शिरगावकर, महेश देसाई, देवा तोडणकर, संदीप पेडणेकर, भाग्यश्री लाकडे, सोनाली डीचवलकर, दीपा शिंदे, निनाक्षी शिंदे, रसिका तळाशीलकर, नंदिनी कुडाळकर, सौ. लुडबे, चैताली देसाई, ऋत्विक बटाव यांच्यासह अन्य पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.