कलंबिस्त पंचक्रोशीत भव्य सैनिक भवन साकारणार - मंत्री दीपक केसरकर
आजी - माजी सैनिकांचा केसरकरांना पाठिंबा
सावंतवाडी प्रतिनिधी
कलंबिस्त , वेर्ले , शिरशिंगे या गावांना सैनिकी परंपरा लाभली असून कलंबिस्त पंचक्रोशीत भव्य दिव्य असे सैनिक भवन मंजूर असून लवकरच या भागात सैनिक भवन साकारले जाईल असे आश्वासन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिले . तसेच आजी माजी सैनिक संघटना , कलंबिस्त यांच्या समस्या आपण निश्चितपणे सोडविणार असेही ते म्हणाले. श्री केसरकर यांच्या निवासस्थानी आजी-माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट श्री केसरकर यांनी घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री केसरकर यांनी आजी-माजी सैनिक संघटनेला स्पष्ट केले कि त्यांनी उभारलेल्या सैनिकी भवनला आपण सहकार्य करणार आहे. तसेच नव्याने सैनिक भवन शासनाच्या माध्यमातून मंजूर झाले आहे. आपण पालकमंत्री असताना हे सैनिक भवन मंजूर आहे. मात्र जागा उपलब्ध केल्यावर भव्य दिव्य असे सैनिक भवन कलंबिस्त येथे उभारले जाईल असे स्पष्ट केले . यावेळी कलंबिस्त , शिरशिंगे, वेर्ळे गावातील आजी माजी सैनिक यांनी केसरकारांची भेट घेत श्री केसरकर यांना आजी माजी सैनिकांनी पाठिंबा दर्शवला .यावेळी आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन दीनानाथ सावंत , कॅप्टन.अरुण सावंत ,पदाधिकारी. माजी सरपंच अनंत सावंत ,प्रकाश सावंत ,सगुण पास्ते , बाळकृष्ण देसाई ,भगवान पास्ते ,संजय सावंत ,संतोष सावंत ,सुरेश गावडे ,सुरेश राऊळ , बाबुराव सावंत आदी उपस्थित होते.