महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वाई तालुक्यात होणार ''वाई स्वच्छता चषक स्पर्धा

05:25 PM Sep 01, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सातारा । प्रतिनिधी

Advertisement

पंचायत समिती वाई यांच्या संयुक्त विद्यमाने वाई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये वाई स्वच्छता चषक स्पर्धा राबविणेत येणार आहे . पाणी व स्वच्छता विभागांतर्गत स्वच्छ भारत मिशन हे अभियान देशपातळीवर अत्यंत प्रभावी पणे राबविण्याचे येत आहे. यामध्ये शासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्यमान उंचविण्याकरिता वैयक्तिक शोचालय ,सार्वजनिक शोचालय , घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ,मैलागाळ व्यवस्थापन ,प्लास्टिक व्यवस्थापन व इ . अशा विविध उपाययोजना शासनामार्फत गावपातळीवर राबविण्यात येतात . याकरिता सदर योजनेच्या कामाला गती मिळणे तसेच तालुक्यातील स्वच्छतेविषयक भेडसावणाऱ्या समस्यांना आळा घालणे ,गावातील साथीचे रोगांवर उपाययोजना करणे ,गावातील ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणे आवश्यक आहे . त्याकरिता वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा .विजयकुमार परीट साहेब यांच्या संकल्पनेतून वाई स्वच्छता चषक स्पर्धे चा शुभारंभ वाई - खंडाळा -महाबळेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा .श्री मकरंद (आबा ) यांच्या शुभहस्ते पंचायत समिती येथे करण्यात आला . वाई स्वच्छता चषक स्पर्धे अंतर्गत विशेष स्वच्छता अभियान दि .02 सप्टेंबर ते 15 ऑक्टोम्बर या कालावधी प्रति दिन नविन उपक्रम वेळापत्रकाप्रमाणे राबविण्यात येणार आहे . या स्पर्धे अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांचे पंचायत समिती वाई चे सहा .गटविकास अधिकारी मा .श्री .बाळासो जाधव , उपअभियंता (ग्रा .पा .पु ).मा .सुनील मेटकरी ,तालुका आरोग्य अधिकारी मा .श्री .यादव,गटशिक्षण अधिकारी मा .श्री .वाळेकर , तसेच सर्व विभागाचे खाते प्रमुख , विस्तार अधिकारी ,पर्यवेक्षिका ,शाखा अभियंता ,पाणी व स्वच्छता विभागाचे तालुका समन्वयक यांच्या मार्फत मूल्यांकन करण्यात येणार असून जास्त गुण प्राप्त करणाऱ्या तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना रोख रक्कम बक्षिस व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे . त्या करिता गावातील गणेशोत्सव मंडळे ,युवा मंडळातील युवक ,गावामधील तरुण मुले ,मुली ,महिला आणि ग्रामस्थांनी हे अभियान यशस्वीपणे राबविण्याकरिता उत्फुर्तपणे सहभाग घेणेबाबत श्री .परीट यांनी सर्वांना आवाहन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news #tarun bharat official
Next Article