For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वडगाव-येळळूर रस्ता बनलाय कचरा डेपो

11:04 AM Oct 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
वडगाव येळळूर रस्ता बनलाय कचरा डेपो
Advertisement

दुर्गंधी सुटल्याने नागरिकांना त्रास : कचऱ्याची वेळेवर उचल नसल्याने समस्या

Advertisement

वार्ताहर/येळळूर

वडगाव ते येळ्ळूर रस्त्यावर येळ्ळूर केएलई ते बळ्ळारी नाला दरम्यान कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचल्याने या भागाला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पडणाऱ्या पावसाने कचऱ्याला दुर्गंधी सुटल्याने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. येथे कचरा टकण्याचे काम या भागातील नागरिक नेहमीच करीत असून यावर बंधन आणणे गरजेचे आहे. या भागासाठी घंटागाडीची सोय नसेल तर ती सोय करून ही समस्या दूर करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. येथून जवळच केएलईसारखे हॉस्पिटल असून या ठिकाणी शेकडो रुग्ण व त्यांना भेटायला येणारे नातेवाईक यांची गर्दी असते. या दुर्गंधीचा थोडाफार परिणाम हॉस्पिटल परिसरालाही होत असून याचा दुष्परिणाम रुग्णांच्या व नागरिकांच्या आरोग्यावरही होण्याची शक्यता आहे. टाकलेला कचरा वेळेवर उचल केला जात नसल्याने दिवसेंदिवस ही समस्या बिकट होत असून कचरा टाकण्याचा परिसरही दिवसेंदिवस मोठा होत जात आहे. आज बाहेरून आलेल्या व्यक्तीला ही जागा म्हणजे कचरा डेपोच वाटते. दुर्गंधी आणि कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Advertisement

भटक्या कुत्र्यांमुळे वाहनधारकांची तारांबळ

साचलेल्या कचऱ्यात अन्नाच्या शोधात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून तो त्यांचा अड्डाच बनला आहे. कुत्र्यांचे कळप दिवसा व रात्री एकमेकांवर भूंकत धावतानाचे चित्र नेहमीचेच आहे. यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. बऱ्याचवेळा कुत्र्यांना चुकवताना अपघात होऊन वाहनचालक जायबंदी झाले आहेत. सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असून जाताना या परिसरातून त्यांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागते. रात्रीचा प्रवास तर नकोच वाटतो. आज या परिसरात भटक्या कुत्र्यांनी कायमची वस्ती केल्याचे चित्र आहे. शिवाय त्यांची लहान पिल्ले रस्त्यावरून आडवी  पळत असल्याने त्यांना चुकवताना वाहनधारकांच्या नाकीनऊ येते. त्यामुळे भविष्यात या भटक्या कुत्र्यांची समस्या उद्भवणार आहे.

Advertisement
Tags :

.