For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘बदतमीज गिल’मध्ये वाणी कपूर

07:00 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘बदतमीज गिल’मध्ये वाणी कपूर
Advertisement

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर यापूर्वी 2022 मध्ये प्रदर्शित शमशेरा या चित्रपटात दिसून आली होती. तेव्हापासून तिचे चाहते अभिनेत्रीच्या नव्या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. आता लवकरच वाणी ही नवजोत गुलाटी यांचा आगामी चित्रपट ‘बदतमीज गिल’मध्ये दिसून येणार आहे. हा चित्रपट आधुनिक काळातील नाट्या दर्शविणारा असून यात बरेली आणि लंडनशी निगडित कहाणी पहायला मिळेल. बदतमीज गिल चित्रपटाचे चित्रिकरण बरेलीत केले जाईल. यात वाणी कपूरसोबत अपारशक्ती खुराना  दिसून येईल. तर अभिनेता परेश रावल यात वाणी कपूर साकारत असलेल्या युवतीच्या पित्याच्या भूमिकेत असतील. या चित्रपटाची निर्मिती निकी भगनानी, विक्की भगनानी, विनय अग्रवाल, अंकुर तकरानी आणि अक्षद घोने यांच्याकडून केली जात आहे. वाणी यापूर्वी कॉमेडी आणि कौटुंबिक मनोरंजन शैलीच्या चित्रपटांमध्ये दिसून आलेली नाही. अशाप्रकारच्या चित्रपटांमध्ये ती उत्तम काम करेल असे आमचे मानणे आहे. या चित्रपटासाठी आम्हाला एक सुंदर आणि आत्मविश्वासाने युक्त युवतीची गरज होती. व्यक्तिरेखेची गरज पाहता वाणी योग्य अभिनेत्री असल्याचे निर्मात्यांकडून म्हटले गेले आहे. वाणी याचबरोबर ‘खेल खेल में’ चित्रपटातही दिसून येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तापसी पन्नू, अक्षय कुमार, एमी विर्कसोबत अनेक कलाकार दिसून येतील.

Advertisement

Advertisement
Tags :

.