For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘द नाइट एजंट 2’ची घोषणा

06:49 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘द नाइट एजंट 2’ची घोषणा
Advertisement

तिसऱ्या सीझनचीही तयारी सुरू

Advertisement

नेटफ्लिक्सची 2023 मध्ये टॉप सीरिज ठरलेल्या ‘द नाइट एजंट’च्या दुसऱ्या सीझनचा फर्स्ट लुक जारी झाला आहे. रोमांचक सीझन 1 नंतर पुढील कहाणीची प्रतीक्षा करत असलेल्या प्रेक्षकांची उत्सुकता यामुळे वाढली आहे. नव्या सीझनमध्ये एफबीआय एजंट पीटर सदरलँड पुन्हा धोक्यांना सामोरा जाताना दिसून येणार आहे.

पहिल्या सीझनमध्ये अध्यक्षांना वाचविण्याच्या प्रयत्नांमुळे पीटर सदरलँडला सीझन 2 मध्ये नाइट एजंट होण्याची संधी मिळाली आहे. परंतु नाइट अॅक्शनच्या गुप्त संघटनेत काम करणे पीटरला प्रचंड धोका असलेल्या ठिकाणी जावे लागणार आहे.

Advertisement

सीझन 3 ची निर्मिती चालू वर्षाच्या अखेरीस होणार असून याचे चित्रिकरण इस्तंबुल येथे होणार आहे. अध्यक्षांच्या हत्येचा कट उधळल्यावर पीटर आणि रोजच्या यशस्वी मिशनसोबत सीझन एक समाप्त झाला. तर पीटरला त्वरित नाइट एजंट होण्यासाठी बढती दिली जात असल्याचे दाखविले जाणार आहे.

गॅब्रियल बॅसो आणि लुसिएन बुकानन हे पीटर आणि रोज या भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. तर नव्या कलाकारांमध्ये अमांडा वॉरेन, एरियन मंडी, लुईस हर्थम, बर्टो कोलन सामील आहेत. ब्रिटनी स्नो आणि टेडी सियर्स देखील सीरिजमध्ये दिसून येतील.

Advertisement
Tags :

.