कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘अबीर गुलाल’मध्ये वाणी कपूर

06:15 AM Apr 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाकिस्तानी कलाकारही मुख्य भूमिकेत

Advertisement

 वाणी कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांची मुख्य भूमिका असेलला चित्रपट ‘अबीर गुलाल’चा टीझर प्रदर्शित करणत आला आहे. या चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे, परंतु चित्रपटात पाकिस्तानी कलाकार असल्याने याच्या प्रदर्शनाला विरोध देखील होत आहे.

Advertisement

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने स्वत:च्या इन्स्टाग्रामवर आगामी चित्रपट ‘अबीर गुलाल’चा टीझर पोस्ट केला. या टीझरमध्ये फवा आणि वाणी पावसाळ्याच्या ऋतूत एका कारमध्ये बसलेले दिसून येतात. व्हिडिओत फवाद एका जुन्या चित्रपटाचे गाणी गुणगुणत असताना दिसून येतो, ज्यानंतर वाणी अभिनेत्याला फ्लर्ट करतोयस काय अशी विचारणा करते. यावर अभिनेता तुझी इच्छा आहे का अशी उलट विचारणा करत असल्याचे यात दिसून येते. या व्हिडिओला पोस्ट करताना वाणीने कॅप्शनदाखल प्रतीक्षा संपुष्टात असे नमूद केले. तसेच 9 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये भेटू असे लिहिले आहे.

आरती बागडी यांच्या दिग्दर्शनाखालील हा चित्रपट ए रिचर लेंसच्या बॅनर अंतर्गत निर्माण करण्यात आला आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून तो लंडनमधील प्रेमकहाणी दर्शवितो.

फवाद हा पाकिस्तानी अभिनेता असून तो यापूर्वी ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात दिसून आला आहे. 2016 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाल्यावर फवाद बॉलिवूडपासून दुरावला होता, परंतु अभिनेता आता 9 वर्षांनी पुनरागमन करत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article