कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेई यीला नमवून उझबेकिस्तानचा सिंदारोव्ह विजेता

06:05 AM Nov 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फिडे बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारा सर्वांत तऊण खेळाडू ठरण्याचा मान

Advertisement

वृत्तसंस्था/ पणजी

Advertisement

उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हने बुधवारी येथे चीनच्या वेई यीचा पराभव करून फिडे विश्वचषक जिंकला आणि 19 वर्षांचा हा खेळाडू असा पराक्रम करणारा सर्वांत तऊण बुद्धिबळपटू बनला आहे.

उझबेकिस्तानचा हा खेळाडू ग्रँडमास्टर सहज ग्रोव्हरच्या दृष्टीने जेतेपदाचा भक्कम दावेदार होता आणि क्वार्टरफायनल सुरू झाल्यानंतर ग्रोव्हरने सिंदारोव्हला पसंती देताना त्याची भरपूर स्तुती केली होती. असे दिसून आले की, वेई यीने पांढऱ्या सोंगाट्यांसह खेळताना सहज सामना बरोबरीत सोडवला. परंतु दुसऱ्या गेममध्ये सिंदारोवने यीचा बचाव भेदत सर्वोत्तम कामगिरी केली.

उझबेकिस्तानच्या या तऊण खेळाडूला धक्क्यांसाठी विख्यात या स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हा 16 वे मानांकन लाभले होते. त्याने 1 लाख 20 हजार डॉलर्सचे (1 कोटी ऊपयांहून अधिक) बक्षीस पटकावलेले असून सिंदारोव्ह आणि वेई हे दोघेही कँडिडेटमध्ये खेळतील. वेई यीने 85 हजार डॉलर्सची कमाई केली आहे. एकंदर परिस्थिती पाहता सिंदारोव्ह, वेई यी आणि रशियाचा आंद्रे एसिपेंको हे या विश्वचषकातून कँडिडेटसाठीं पात्र ठरलेले खेळाडू आहेत आणि त्यांच्यासोबत अमेरिकेचा फॅबियानो काऊआना, हॉलंडचा अनीश गिरी आणि जर्मनीचा मॅथियास ब्लूबॉम हे खेळाडू असतील. कमालीची अनपेक्षित कलाटणी मिळाली नाही, तर आर. प्रज्ञानंद आणि हिकारू नाकामुरा हे स्पर्धेत पोहोचणे जवळजवळ निश्चित आहे.

नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हनंतर उझबेकिस्तानमधील सिंदारोव्ह हा दुसरा सर्वांत मोठा स्टार खेळाडू म्हणून समोर आला आहे आणि असे दिसते की, या खेळातील रशियाचे वर्चस्व अखेर संपले आहे. उझबेकिस्तानचे स्टार खेळाडू किती काळ वर्चस्व गाजवतात हे पाहावे लागेल. परंतु सध्या तरी हे स्पष्ट आहे की, मॅग्नस कार्लसनविना युरोप नव्हे, तर आशिया बुद्धिबळ जगतावर वर्चस्व गाजवत आहे. जरी संगणकाने वेगळे मूल्यांकन केले असले, तरी मधल्या खेळाच्या सुऊवातीपासूनच सिंदारोव्हने वेई यीवर वर्चस्व गाजविले. दुसऱ्या गेममध्ये इटालियन ओपनिंगनंतर खेळाने आकार घेतला तेव्हा सिंदारोव्हला काळजी करण्यासारखी काही गोष्टी होत्या. परंतु त्याने हत्तीचा योग्य वापर करत प्रतिस्पर्ध्याची निर्णायक हानी केली. त्यापूर्वी पहिल्या गेममध्ये वेई यीला आणखी एक चांगला सामना बरोबरीत सोडवताना पुरेसे सुरक्षित वाटले होते, परंतु त्याचे डावपेच कामी येऊ शकले नाहीत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article