For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उझ्बेकची भारतावर मात एएफसी आशियाई चषक

06:09 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
उझ्बेकची भारतावर मात एएफसी आशियाई चषक
Advertisement

वृत्तसंस्था/ डोहा

Advertisement

एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी येथे खेळविण्यात आलेल्या ब गटातील सामन्यात उझ्बेकीस्तानने भारताचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाने भारताचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले होते.

उझ्बेक संघातील खेळाडूंनी पहिल्यापासूनच आपल्या वेगवान आणि आक्रमक खेळाच्या जोरावर भारतीय बचावफळीवर चांगलेच दडपण आणले. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला उझ्बेकचे खाते अब्बूसिबेक फैजुल्लाने उघडले. 18 व्या मिनिटाला इगोर सर्गिव्हने उझ्बेकची आघाडी 2-0 अशी वाढवली. नेसरुलाएव्हने 48 व्या मिनिटाला उझ्बेकचा तिसरा गोल नोंदवून भारतावर अधिकच दडपण आणले.या स्पर्धेत उझ्बेकचा हा पहिला विजय आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सिरीयाने उझ्बेकला बरोबरीत रोखले होते. भारताला या सामन्यात शेवटपर्यंत आपले खाते उघडता न आल्याने हा सामना एकतर्फी गमवावा लागला. भारताचा हा स्पर्धेतील ब गटातील शेवटचा सामना सिरीयाबरोबर 23 जानेवारीला खेळवला जाईल.

Advertisement

Advertisement

.