For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तराखंड, आसाम, सिक्कीम, झारखंड संघ विजयी

10:09 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
उत्तराखंड  आसाम  सिक्कीम  झारखंड संघ विजयी
Advertisement

कर्नाटक, राजस्थान, सिक्कीम, आसाम संघ उपांत्य फेरीत

Advertisement

बेळगाव : भारतीय फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त, कर्नाटक फुटबॉल संघटना व बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित ज्युनिअर मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत उत्तराखंडने तेलंगणाचा, झारखंडने बिहारचा, आसामने पंजाबचा तर सिक्कीमने मेघालयाचा पराभव करुन प्रत्येकी दोन गुण मिळविले. लव्हडेल स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात उत्तराखंड संघाने तेलंगणाचा 2-1 असा गोलफरकाने पराभव केला. उत्तराखंडतर्फे 22 व्या मिनीटाला आयुषनेगीने पहिला गोल केला तर दुसऱ्या सत्रात 50व्यामिनीटाला अक्षता तडियाळ दुसरा गोल करुन 2-0ची आघाडी मिळवून दिली. 71 व्यामिनीटाला तेलंगणाच्या समिक्षा गोटीपाटीने गोल करुन 1-2 अशी आघाडी कमी केली. दुसऱ्या सामन्यात झारखंडने बिहारचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 27 व्या मिनीटाला निकिता काचप्पच्या पासवर अनुष्का कुमारीने गोल करुन 1-0ची आघाडी मिळवून दिली. 44 व्या मिनीटाला अनुषकाच्यापासवर रिनाकुमारीने दुसरागोल करुन पहिल्या सत्रात 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 81 व्या मिनीटावर रिनाच्या पासवर निकिता काचप्पने तिसरा गोल करुन 3-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात बिहारला गोल करण्यात अपयश आले.

तिसऱ्या सामन्यात आसामने पंजाबचा 3-1 असा पराभव केला. या सामन्यात आसामच्या आरती मुंदाने 27, 53 व 68 व्या मिनीटाला सलग 3 गोल करुन स्पर्धेतील पाचवी हॅट्ट्रीक मिळविली. 47 व्या मिनीटाला पंजाबच्या गुरूनाज कौरने एकमेव गोल केला. चौथ्या सामन्यात सिक्कीमने मेघालयाचा 2-1 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्राच्या 41 व्या मिनीटाला यालग्रीप लिपेचाच्यापासवर स्मिता सुनदासने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात मेघालयाच्या  इल्डाकी कासोने गोल करुन 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. 77 व्या मिनीटाला समिताच्या पासवर यालग्रीप लिपेचाने गोल करुन 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. या स्पर्धेत आतापर्यंत चार संघांनी उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला असून कर्नाटक, राजस्थान, सिक्कीम आसाम संघांनी प्रवेश मिळविला असून बुधवारी पहिला उपांत्यफेरीचा सामना कर्नाटक विरूद्ध आसाम यांच्यात सकाळी 8.30 वाजता तर दुसरा उपांत्यफेरीचा सामना राजस्थान व सिक्कीम यांच्यात दुपारी खेळविला जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.