For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोजिमाशि' च्या चेअरमनपदी उत्तम पाटील तर व्हाईस चेअरमनपदी श्रीकांत कदम यांची बिनविरोध निवड

07:24 PM Jan 28, 2024 IST | Abhijeet Khandekar
कोजिमाशि  च्या चेअरमनपदी उत्तम पाटील तर व्हाईस चेअरमनपदी श्रीकांत कदम यांची बिनविरोध निवड
Advertisement

धामोड / वार्ताहर

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या नुतन चेअरमनपदी श्री उत्तम विलास पाटील ( आ.भोगावकर हाय .बाजार भोगावं , ता . पन्हाळा ) यांची तर व्हाईस चेअरमनपदी श्री श्रीकांत मधुकर कदम (विनायक हाय.शहापूर , ता .हातकणंगले ) यांची संचालक मंडळाच्या बैठकित बिनविरोध निवड करण्यात आली . या निवडी शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या .बैठकिच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पाटील होते . निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली. निवड प्रक्रियेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे यांनी केले.

Advertisement

शाहुुपुरी येथील मुख्य कार्यालयात झालेल्या या बैठकित चेअरमनपदासाठी उत्तम पाटील व व्हाईस चेअरमनपदासाठी श्रीकांत कदम यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पाटील यांनी या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले . चेअरमन पदासाठी पाटील यांचे नावास सूचक संचालक मदन निकम व अनुमोदन प्रकाश कोकाटे होते. तर व्हाईस चेअरमन पदासाठी कदम यांचे नावास सूचक संचालक राजेंद्र पाटील व अनुमोदन पांडुरंग हळदकर होते.

यावेळी संचालक बाळ डेळेकर , राजेंद्र रानमाळे , अनिल चव्हाण , डॉ दत्तात्रय घुगरे,पांडुरंग हळदकर, प्राचार्य श्रीकांत पाटील , मदन निकम , सुभाष खामकर , अविनाश चौगले , दिपक पाटील , राजेंद्र पाटील , जितेंद्र म्हैशाळे, शरद तावदारे , प्रकाश कोकाटे , मनोहर पाटील , सचिन शिंदे , राजाराम शिंदे , सौ .ऋतुजा पाटील , शितल हिरेमठ आदीसह मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कवडे , संगणक अधिकारी नितीन शिंदे उपस्थित होते

Advertisement

निवडीनंतर नुतन चेअरमन , व्हाईस चेअरमन यांचा सत्कार शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते करण्यात आला . सभासदांनी ' स्वाभिमानी सहकार ' आघाडीवर विश्वास ठेवून चौथ्यांदा एकहाती सत्ता दिली . त्यामुळे सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन दिलेल्या वचननाम्याची वचनपुर्ती टप्याटप्याने केली जाईल अशी ग्वाही आघाडीप्रमुख दादासाहेब लाड यांनी यावेळी दिली .
आघाडीचे नेते दादासाहेब लाड यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काटकसरीचा आदर्शवत असा पारदर्शी कारभार केला जाईल असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना चेअरमन उत्तम पाटील व व्हाईस चेअरमन श्रीकांत कदम यांनी केले .

Advertisement

.