For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजस्थान पोलीस महासंचालकपदी उत्कल साहू

06:35 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजस्थान पोलीस महासंचालकपदी उत्कल साहू
Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

Advertisement

राजस्थान पोलीस महासंचालकपदी उत्कल रंजन साहू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्मिक विभागाने यासंबंधी आदेश जारी केले आहेत. आता आगामी दोन वर्षांसाठी साहू हे या पदावर असणार आहेत. 30 डिसेंबर 2023 रोजी उमेश मिश्रा यांनी पोलीस महासंचालक पद सोडत स्वैच्छिक सेवानिवृत्ती स्वीकारली होती.  त्यानंतर उत्कल साहू यांना प्रभारी पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तर साहू यांनी रविवारी पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

आयपीएस उत्कल साहू हे 1988 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. साहू हे मूळचे ओडिशाचे आहेत. डिसेंबर 2020 मध्ये त्यांना महासंचालक स्तरीय पदावर बढती मिळाली होती. त्यानंतर ते होमगार्डचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. 2016 मध्ये राष्ट्रपती पोलीस पदकाने त्यांना गौरविण्यात आले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.