For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करा

11:51 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करा
Advertisement

शहापूर-वडगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत पोलिसांची सूचना

Advertisement

बेळगाव : गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याची जबाबदारी केवळ पोलिसांची नाही. मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीही ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन शहापूर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी केले. सोमवारी जिव्हेश्वर मंगल कार्यालयात झालेल्या गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व शांतता समिती सदस्यांच्या बैठकीत त्यांनी वरील आवाहन केले.

शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी, उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी, नगरसेवक रवी साळुंखे, माजी नगरसेवक रमेश सोंटक्की आदींसह शहापूर, वडगाव परिसरातील बहुसंख्य मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गणेशोत्सवाच्या काळात डीजेला बंदी असणार आहे. उत्सवाच्या काळात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असे आवाहनही केले. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी लोंबकळणाऱ्या वीजतारा, खड्डे आदी समस्या मांडल्या. बैठकीत उपस्थित हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी लवकरच दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली. उत्सवाच्या काळात प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही लावावेत. पोलीस दलाच्यावतीनेही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, असे सीमानी यांनी सांगितले.

Advertisement

लवकर श्री विसर्जन करणाऱ्या मंडळांना बक्षीस देण्याचे जाहीर

जावेद मुशापुरी शहापूरचे पोलीस निरीक्षक असताना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकावर लवकरात लवकर श्री मूर्तींचे विसर्जन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना बक्षीस देत होते. त्याचप्रमाणे सध्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी यांनीही लवकर श्री विसर्जन करणाऱ्या मंडळांना बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.

Advertisement
Tags :

.