For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तराखंड येथील बचावकार्यात बेळगावच्या रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर

11:19 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
उत्तराखंड येथील बचावकार्यात बेळगावच्या रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर
Advertisement

एल अॅण्ड टी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश

Advertisement

बेळगाव : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळला. या बोगद्यात 36 हून अधिक मजूर अडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या बचाव कार्यामध्ये बेळगावमधील एल अॅण्ड टी कंपनीचे कर्मचारी सहभागी झाले. रोबोटिक पॅमेऱ्याचा वापर करून टनेलमध्ये अडकलेले कामगार कोणत्या स्थितीत आहेत, याची माहिती सर्वांना समजू शकली. त्यामुळे बेळगावच्या या कामगारांचे कौतुक केले जात आहे. बेळगावमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या एल अॅण्ड टी कंपनीने काही दिवसांपूर्वीच रोबोटिक पॅमेऱ्याचा वापर सुरू केला होता. जलवाहिनीला गळती नेमकी कोणत्या ठिकाणी आहे, हे समजण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यामुळे कोठेही खोदाई न करता योग्यरित्या व कमी वेळेत दुरुस्तीचे काम करणे सोयीचे ठरत होते. उत्तराखंड येथे काम सुरू असताना कामगार टनेलमध्ये अडकले. बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून अडकलेले कर्मचारी अंदाजे 260 मीटर अंतरावर आहेत. हे कर्मचारी कोणत्या स्थितीत आहेत, याची माहिती मिळावी यासाठी बेळगावच्या रोबोटिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला. एका मोठ्या पाईपमधून रोबोटिक कॅमेरा टनेलमध्ये सोडण्यात आला. यामुळे आतील कामगारांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले आहे. एल अॅण्ड टी कंपनीने दुलदीप खंद्रा, भालचंद्र किलारी यांची बचावकार्य पथकामध्ये निवड केली. विमानाने हे कर्मचारी उत्तराखंड येथे पोहोचले आणि त्यांनी अडकलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती कॅमेऱ्याद्वारे टिपली. यामुळे बचावकार्य करणे सोयीचे झाले. बेळगावच्या या कामगारांचे तसेच एल अॅण्ड टी कंपनीच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.