ऑनलाईन लुबाडणुकीसाठी मंत्री, आमदारांच्या नावांचा वापर
मंत्री रवी नाईक, गुदिन्हो, खंवटे, आमदार शेट, काब्राल, आरोलकर यांच्या नावे मागितले पैसे,नाव, फोटो वापरुन बनावट खात्याद्वारे पाठविले मेसेज
पणजी, फोंडा :बनावट व्हॉट्सअॅप अॅपद्वारे या सर्वांच्या नावाने व्हॉट्सअपद्वारे लोकांना मेसेज पाठवून पैसे मागण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत सर्व सहाजणांनी सायबर गुन्हा विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. लोकांनी कोणत्याही क्रमांकावऊन पैसे मागण्यासंदर्भात मेसेज आल्यास त्यास प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन या सर्वांनी जनतेला केले आहे. बुधवारी रात्रीपासून ते गुऊवारी दुपारपर्यंत हा फसवणुकीचा प्रकार सुऊ होता.
पे ई गिफ्ट कार्डद्वारे मागणी
मंत्री माविन गुदिन्हो यांच्या बनावट व्हॉट्सअप अकाउंटच्या संदर्भात वास्को पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरा त्यांच्या फेसबूक पेजवर एका पोस्टमध्ये अॅमेझॉन पे ई-गिफ्ट कार्डद्वारे पैशाची मागणी करणारा मेसेज टाकण्यात आला. गुदिन्हो यांचे नाव आणि फोटो खोटा संदेश प्रसारित करण्यात आला. संदेश फसवा आहे आणि मी अशा कृत्याचा तीव्र निषेध करत आहे, असे माविन गुदिन्हो यांनी म्हटले आहे. कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल आणि कृषिमंत्री रवी यांचे डीपी फोटो असलेले बनावट व्हॉट्सअप खाते उघडून लोकांकडून पैसे मागण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. काब्राल यांनी गुऊवारी सांगितले की, त्यांच्या समर्थकांनी त्यांना याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर तक्रार दाखल केली आहे.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या नावे देखील काहींना मेसेज पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी देखील याबाबत पोलिसात तक्रार नोंदवली आहे. मांद्रेचे आमदार जीत अरोलकर यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे. फलोत्पादन महामंडळाचे संचालक चंद्रहास देसाई यांच्याशी अज्ञाताने मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांची फेक व्हॉट्सअप प्रोफाइल बनवून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आमदार शेट यांनी 977 9702833748 या क्रमांकावरून कुणीही संपर्क साधत पैशांची मागणी केल्यास त्यास तात्काळ ब्लॉक करावे, असे म्हटले आहे.
लोकांनी बळी पडू नये : नाईक
मंत्री रवी नाईक यांचे नाव आणि फोटो वापरून फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या 204 कलमाअंतर्गत व माहिती तंत्रज्ञान सुधारणा कायद्याखाली अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीकडून कृषी मंत्री रवी नाईक यांचा फेक प्रोफाईलसह व्हॉटसअॅप नंबरवर फोटो वापरून संदेश पाठवेले जात आहे. 23 ऑक्टोबर रोजी कृषिमंत्र्यांचे सचिव मंदार शिरोडकर यांना त्यांच्या मोबाईलवर रवी सीताराम नाईक नावाने सेव्ह केलेल्या एका व्हॉटसअॅप अकाऊंटवरून मंत्री रवी नाईक यांचा फोटो असलेला व्हॉटसअॅप संदेश आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अशा बनावट खात्यावरून करण्यात येत असलेल्या संदेशाला जनतेने बळी पडू नये असे आवाहन मंत्री रवी नाईक यांनी केले आहे. हे बनावट फोटो आणि प्रोफाईल करणाऱ्यांकडून मंदार शिरोडकर यांना संदेश पोचल्यानंतर हे बनावट व्हॉट्सअॅप खाते कुणीतरी चालवत असल्याचा संशय आला. त्यामुळे मंत्री रवी नाईक यांच्या कार्यालयाकडून फोंडा पोलिसस्थानकात तक्रार देण्यात आली. या खात्यावरून आलेल्या रिक्वेस्ट कोणीही स्विकारू नयेत. तसेच कोणीही व्यवहार करून संदेश फॉरवर्ड करू नयेत. इतर कोणालाही असे संदेश आल्यास त्वरित आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन मंत्री नाईक यांच्या कार्यालयातून करण्यात आले आहे.