For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅन्सरवरील उपचारासाठी भारतीय मसाल्यांचा वापर

06:22 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅन्सरवरील उपचारासाठी भारतीय मसाल्यांचा वापर
Advertisement

आयआयटी मद्रासकडून रिसर्च पेटंट : परीक्षण लवकरच : 2028 पासून उपलब्ध होणार औषधे

Advertisement

► वृत्तसंस्था/ चेन्नई

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रासने भारतीय मसाल्यांवरून एक रिसर्च पेटंट केला आहे. भारतीय मसाल्यांद्वारे कर्करोग बरा करणारे औषध निर्माण करता येऊ शकते असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. यासंबंधी वैद्यकीय परीक्षण लवकरच सुरू होणार आहे. 2028 पर्यंत ही औषधे बाजारात उपलब्ध होऊ शकतो असे रविवारी सांगण्यात आले.

Advertisement

भारतीय मसाले लंग कॅन्सर सेल, ब्रेट कॅन्सर सेल, कोलन कॅन्सर सेल, सर्वायकल कॅन्सर सेल, ओरल कॅन्सर सेल आणि थायरॉइड कॅन्सर सेलमध्ये अँटी कॅन्सर अॅक्टिव्हिटी दाखवितात. हे मसाले सामान्य पेशींना कुठलीही हानी पोहोचवत नसल्याचा दावा संशोधकानी केला आहे. संशोधन सध्या यासाठी येणारा खर्च आणि सुरक्षेच्या आव्हानांवर काम करत आहेत. यासंबंधी प्राण्यांवर अध्ययन झाले आहे. हे संशोधन आयआयटी मद्रासचे एलुमनाई आणि प्रतीक्षा ट्रस्टद्वारे इन्फोसिसचे सह-संस्थापक गोपालकृष्णन यांच्याकडून प्राप्त आर्थिक सहाय्यामुळे शक्य झाले आहे.

औषधांच्या डोसविषयी परीक्षणात समजणार

कॉमन कॅन्सर भारतीय मसाल्यांद्वारे निर्मित औषधांमुळे बरा होऊ शकतो असा दावा अनेक अध्ययनांमध्ये करण्यात आला आहे. परंतु कॅन्सरमधून बरे होण्यासाठी किती डोस असावा हे परीक्षणात स्पष्ट होणार असल्याचे आयआयटी मद्रासच्या मुख्य वैज्ञानिक अधिकारी जॉयस निर्मला यांनी सांगितले आहे. सध्या कॅन्सरवर जे उपचार केले जातात, त्याचे प्रचंड दुष्परिणाम असतात. कॅन्सरवर स्वस्त आणि कमीतकमी दुष्परिणाम असणारी उपचारपद्धत विकसित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आमचा देश जगात सर्वाधिक मसाले निर्माण करणारा देश आहे. आमच्या देशात अत्यंत स्वस्त दरात मसाले तयार होतात. या औषधांना इंजेक्शनद्वारे देण्याची वेळ येऊ नये अशी आमची इच्छा आहे. रुग्णांना ही औषधे गिळता यावीत असे त्यांनी म्हटले आहे.

प्रयोगशाळेत स्टेबल प्रॉडक्ट निर्माण

कॅन्सरवरील औषध तयार करण्यासाठी त्याच्या मॉलिक्युलर पातळीवर स्टेबिलिटी सर्वात महत्त्वपूर्ण असते. आमच्या प्रयोगशाळेत आम्ही स्टेबल प्रॉडक्ट तयार केले आहे. प्रयोगशाळेत संशोधन सुरुच राहणार आहे. प्राण्यांवरील परीक्षणात सकारात्मक निष्कर्ष प्राप्त झाल्याने आता आम्ही वैद्यकीय परीक्षणाच्या टप्प्यात दाखल होणार आहोत अशी माहिती आयआयटी मद्रासच्या केमिकल इंजिनियरिंग विभागाचे प्राध्यापक आर. नागर्जन यांनी दिली.

भारतात कॅन्सररुग्णांची वाढती संख्या

जगात सर्वाधिक मृत्यूंचे कारण ठरलेल्या आजारांमध्ये कार्डियोवॅस्कुलर डिसिज पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कॅन्सर आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कॅन्सरमुळे 2020 मध्ये 1 कोटी लोकांना जीव गमवावा लागला होता. म्हणजेच जगातील प्रत्येक 6 मृत्यूंपैकी एक मृत्यू कॅन्सरमुळे झाला होता. तर भारतात 2020 मध्ये कॅन्सरमुळे 7 लाख 70 हजार जणांचा मृत्यू झाला होता. 2021 मध्ये हा आकडा 7 लाख 79 हजार तर 2022 मध्ये 8 लाख 8 हजारांवर पोहोचला होता.

Advertisement
Tags :

.