For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी पुढील वर्षी निवृत्त! अमित शहा होणार पंतप्रधान; केजरीवालांचा आरोप

03:33 PM May 16, 2024 IST | Abhijeet Khandekar
पंतप्रधान मोदी पुढील वर्षी निवृत्त  अमित शहा होणार पंतप्रधान  केजरीवालांचा आरोप
Arvind Kejriwal
Advertisement

2025 मध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षांचे झाल्यानंतर अमित शहा पंतप्रधान होतील, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. आज लखनौमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह एका संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना केजरीवाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

Advertisement

यापुर्वीही अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्या वयाचा आणि त्यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर यावर बचावात्मक उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुर्वी कधीही अशाप्रकारची वक्तव्य केलं नसून आपली निवृत्ती जाहीर केलेली नाही असं म्हटलं आहे.

त्यानंतर आज लखनौ मध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याबरोबर अरविंद केजरीवाल यांन संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्याच मुद्द्यावर बोलताना, “संपूर्ण देशाचा यावर विश्वास आहे कि आपल्या निवृत्तीच्या ७५ वयाचा नियम नरेंद्र मोदी मोडणार नाहीत,” असा विश्वास व्यक्त केला.

Advertisement

ते म्हणाले, "अमित शहा यांच्यासाठी हा पंतप्रधानपदाचा टप्पा तयार झाला आहे. यापुर्वीही भाजपने शिवराज सिंह चौहान, डॉ. रमणसिंग, वसुंधरा राजे, मनोहर लाल खट्टर, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अनेक नेत्यांना बाजूला केले आहे. आता केवळ योगी आदित्यनाथ हेच यांच्यासमोर मोठे पण येत्या २-३ महिन्यांत त्यांनाही बाजूला सारण्यात येईल किंवा काढून टाकण्यात येईल.” असे सांगताना केजरीवाल यांनी, आदित्यनाथ यांच्याबद्दल जे काही बोललो त्यावर भाजपच्या कोणत्याही नेत्याने आक्षेप घेईन प्रतिक्रिया दिली नाही. याचा अर्थ असा की आदित्यनाथ यांचा निरोप जवळजवळ निश्चित असल्याचं म्हटलं आहे. तसेच भाजपला ४०० चं संख्याबळ कशासाठी पाहीजे ?असा सवाल उपस्थित करताना संविधानाने दिलेलं आरक्षण समाप्त करण्यासाठीच भाजपने ४०० पारचा नारा दिला आहे याचा पुनर्उच्चारही त्यांनी केला.

Advertisement
Tags :

.