महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रचारासाठी ‘कृत्रिम बुद्धीमत्ते’चा उपयोग

05:30 AM Nov 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तेलंगणातील हैद्राबाद येथील प्रतिष्ठेच्या ‘ज्युबिली हिल्स’ विधानसभा मतदारसंघात सिद्धार्थ चक्रवर्ती नामक अपक्ष उमेदवाराने मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी ‘कृत्रिम बुद्धीमत्ते’च्या माध्यमातून प्रचार चालविला आहे. असे करणारे चक्रवर्ती हे भारतातील आजवरचे प्रथम उमेदवार असावेत असे बोलले जाते.  सिद्धार्थ चक्रवर्ती हे स्वत: तंत्रज्ञानतज्ञ आहेत. आपल्या तंत्रवैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग करुन त्यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साहाय्याने नवे प्रचारतंत्र आचरणात आणले आहे. आश्चर्य म्हणजे विधानसभा निवडणूक ऐन भरात आली असताना, ते स्वत: आपला साडेचार वर्षांचा पुत्र युधव आणि सात महिन्यांचा पुत्र युग यांच्या समवेत त्यांच्याकडे लक्ष देत घरातच बराच काळ असतात. पण त्यांनी ‘वाको एआय’ नामक एक साधन कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग करुन विकसीत केले असून त्याच्या माध्यमातून ते आपल्या घरातूनच मतदारसंघातील बहुतेक मतदारांशी संपर्क साधत आहेत. त्यांच्याशी संवादही करीत आहेत आणि त्यांच्या आवश्यकता थेट समजून घेत आहेत. घरोघरी फिरुन प्रचार ही संकल्पना आता कालबाह्या झाली असून भविष्यात अशा तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेच मतदारांशी थेट संपर्क आणि संवाद करणे सुलभ होणार आहे. यात खर्च अगदी कमी येतो. प्रचार प्रभावीपणे करता येतो आणि मतदारांना थेट भेटल्याचे समाधानही मिळते, असे त्यांचे प्रतिपादन आहे. मोठे राजकीय पक्ष आजही जुन्या प्रचारपद्धतीतून बाहेर पडावयास तयार नाहीत. तथापि, आपण या नव्या प्रचारपद्धतीचा प्रारंभ केला असून भविष्य काळात हीच प्रचारपद्धती इतर सर्व पद्धतीना मागे टाकणार आहे, असा ठाम विश्वास ते व्यक्त करतात. मतदारांनाही या पद्धतीचे आकर्षण आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article