महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

क्रोएशियातील स्पर्धेत अमेरिकेचा कारुआना विजेता

06:31 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुपरयुनायटेड रॅपिड-ब्लिट्झ बीद्धबळ स्पर्धा : गुकेशला सातवे, गुजराथीला 11 वे स्थान

Advertisement

वृत्तसंस्था/ झाग्रेब, क्रोएशिया

Advertisement

येथे झालेल्या सुपरयुनायटेड रॅपिड, ब्लिट्झ स्पर्धेत भारताच्या डी गुकेशने सातवे स्थान मिळवित भारतातर्फे सर्वोत्तम कामगिरी नोंदवली तर अग्रमानांकित फॅबिआनो कारुआनाने जेतेपद पटकावले.

गुकेशने या स्पर्धेत एकूणा 14 गुण मिळविले तर भारताचा अन्य एक खेळाडू विदित गुजराथीने 11 गुणांसह नववे स्थान मिळविले. कारुआनासाठी ही स्पर्धा उत्तम कामगिरी करणारी ठरली. त्याने सुपरबेट क्लासिक स्पर्धेनंतर ही स्पर्धा जिंकली आहे. त्याने एकूण 27 गुणांची कमाई केली. त्यात 9 रॅपिड व 18 ब्लिट्झ फेऱ्या होत्या. कारुआनाने या स्पर्धेवर पूर्ण वर्चस्व राखत जेतेपद पटकावले. त्याचा जवळचा प्रतिस्पर्धी तब्बल चार गुणांनी मागे राहिला. त्याला 40000 डॉलर्सचे बक्षीस मिळविताना नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनच्या विक्रमाशी बरोबरीही केली. 2019 मध्ये कार्लसनने एकूण 27 गुण मिळविले होते, त्याची बरोबरी कारुआनाने केली.

फ्रान्सचे अलीरेझा फिरोझा व मॅक्झिम व्हाशियर लॅग्रेव्ह, अमेरिकेचा वेस्ली सो यांनी प्रत्येकी 23 गुणांसह संयुक्त दुसरे स्थान मिळविले. रशियाच्या इयान नेपोमनियाचीने 18.5 गुणांसह पाचवे तर आर्मेनियाच्या लेव्हॉन अॅरोनियनने 17 गुणांसह सहावे स्थान मिळविले. गुकेशने 14 गुण घेत स्पर्धेची सांगता केली असून  येत्या नोव्हेंबरमध्ये चीनच्या डिंग लिरेनविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप लढतीआधी त्याच्या ब्लिट्झमधील कामगिरीचा त्याच्या संघाकडून आढावा घेतला जाणार आहे. नेदरलँड्सच्या अनिश गिरीने 13.5 गुणांसह आठवे व क्रोएशियाच्या इव्हान सारिचने 10 गुणांसह शेवटचे स्थान मिळविले.

कारुआनाने ग्रँड चेस टूरमध्येही आघाडी आणखी वाढविली आहे. या स्पर्धेआधी या टूरमध्ये भारताचा आर. प्रज्ञानंद आघाडीवर होतो. पण त्याने या स्पर्धेत भाग घेतला नसल्याने कारुआनाने 22.5 गुणांसह आघाडीचे स्थान पटकावले आहे. फिरोझा 17.58 गुणासह त्याच्या पाठोपाठ आहे. प्रज्ञानंदची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली असून त्याचे 16.25 गुण झाले आहेत. येत्या ऑगस्टमध्ये अमेरिकेतील सेंट लुईस येथे होणाऱ्या दोन स्पर्धांत प्रज्ञानंदला आघाडीवर पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल.

गुकेशची रॅपिड विभागातील कामगिरी समाधानकारक झाली. यात त्याने 18 पैकी 9 गुण मिळविताना तीन विजय, तीन बरोबरी व तीन पराभव स्वीकारले. पण ब्लिट्झ विभागात त्याला 18 सामन्यात केवळ 5 गुणच जमविता आले. याउलट गुजराथीने ब्लिट्झमध्ये चांगली कामगिरी करीत 7 गुण मिळविले. पण रॅपिड विभागात त्याला संघर्ष करावा लागला. याता त्याने फक्त एक विजय नोंदवला व दोन डाव अनिर्णीत राखले.

अंतिम निकाल : 1) कारुआना, अमेरिका 27 गुण, 2-4) फिरोझा, व्हॉशियर लॅग्रेव्ह, फ्रान्स व वेस्ली सो, अमेरिका प्रत्येकी 23 गुण, 5) इयान नेपोमनियाची, फिडे 18.5 गुण, 6) लेव्हॉन अॅरोनियन अमेरिका, 17 गुण, 7) डी गुकेश भारत 14 गुण, 8) अनिश गिरी, नेदरलँड्स 13.5 गुण, 9) विदित गुजराथी, भारत 11 गुण, 10) इव्हान सारिच, क्रेएशिया 10 गुण.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article