अमेरिका पाकिस्तानला पुरविणार एआयएम-120 क्षेपणास्त्र
मुनीर यांच्याकडून झालेल्या कौतुकामुळे ट्रम्प खूश
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
पाकिस्तान मागील काही महिन्यांपासून सातत्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक करताना दिसून येत आहे. पाकिस्तानचे सैन्यप्रमुख आसीम मुनीर यांनी अनेकदा अमेरिकेचा दौराही केला आहे. मुनीर यांच्या चापलुसीचे फळ आता पाकिस्तानला मिळणार आहे. पाकिस्तानला अमेरिकेकडून एआयएम-120 अॅडव्हान्स मीडियम रेंजचे आकाशातून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रs मिळणार आहेत. हे फायर अँड फॉरगेटयुक्त सुपरस्मार्ट क्षेपणास्त्र असून ते कुठल्याही विमानाला दूर अंतरावरूनच पाडवू शकते. हे एआयएम-7 स्पॅरोचे अपग्रेडेड वर्जन आहे. याला स्लॅमर हे नाव देखील प्राप्त आहे, कारण हे अत्यंत वेगाने उ•ाण करते. पाकिस्तानला सी8 वेरिएंट मिळणार असून ते एआयएम-120डी चे एक्सपोर्ट मॉडेल असून यात जीपीएस गायडेन्स आणि प्रभावी जॅम-रेजिस्टेंस आहे.
पाकिस्तान आणि अमेरिकेचे संबंध सध्या सातत्याने सुधारत आहेत. मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार दिवसांपर्यंत सैन्यसंघर्ष झाला होता. भारताने पाकिस्तानचे या संघर्षादरम्यान कंबरडे मोडले होते, नंतर पाकिस्तानी डीजीएमओने भारताला सैन्य कारवाई रोखण्याची विनंती केली होती. यामुळे भारताने पाकिस्तानच्या विनंतीनुसार शस्त्रसंधीला मंजुरी दिली होती. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी आपणच घडवून आणल्याचा दावा केला होता, जो भारताने फेटाळला होता. तर पाकिस्तानने ट्रम्प यांच्या दाव्याची पाठराखण केली होती.
अत्याधुनिक क्षेपणास्त्रs देण्याची तयारी
अमेरिकेने पाकिस्तानला एआयएम-120 एएमआरएएम क्षेपणास्त्रs देण्याची योजना आखली आहे. हे अत्यंत अत्याधुनिक क्षेपणास्त्र मानले जाते आणि आकाशातून आकाशात शत्रूचे विमान पाडविण्यास सक्षम आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागानुसार एएमआरएएएमच्या खरेदीदारांमध्ये पाकिस्तानही सामील असल्याचे नमूद केले आहे. रेथियॉन कंपनीला 41.6 दशलक्ष डॉलर्सची अतिरिक्त ऑर्डर देण्यात आली आहे. या क्षेपणास्त्रांच्या सी8 आणि डी3 वर्जनसाठी ही ऑर्डर देण्यात आली आहे. या कराराचे एकूण मूल्य आता 2.51 अब्ज डॉलर्सच्या समीप आहे. या कराराची पूर्तता 2030 होण्याची अपेक्षा आहे.
पाकिस्तानकडे सी-3 वर्जन
पाकिस्तानला किती क्षेपणास्त्रs मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु पाकिस्तानी वायुदलाच्या एफ-16 लढाऊ विमानांना अपग्रेड करण्यास या क्षेपणास्त्रांमुळे मोठी मदत होणार असल्याचे तज्ञांचे मानणे आहे. पाकिस्तानकडे यापूर्वीच जुनी सी3 वर्जनची 500 हून अधिक क्षेपणास्त्रs आहेत, जी 2010 मध्ये एफ-16 सोबत खरेदी करण्यात आली होती.
भारतासाठी वाढू शकतो धोका
पाकिस्तानसोबत अमेरिकेचा हा संरक्षण करार भारतासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. तसेच एआयएम-120 क्षेपणास्त्रs एफ-16 लढाऊ विमानांवर जोडली जातील, यामुळे ते 100 किलोमीटर अंतरावरून भारतीय विमानांना लक्ष्य करू शकते. 2019 च्या बालाकोट एअरस्ट्राइकवेळी पाकिस्तानने अशाचप्रकारच्या क्षेपणास्त्राद्वारे भारताचे मिग-21 लढाऊ विमान पाडविले होते. यादरम्यान वायुदलाचे अधिकारी अभिनंदन हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. अमेरिकेकडून नवी क्षेपणास्त्रs मिळाल्यास पाकिस्तानी वायुदलाचे सामर्थ्य वाढणार असल्याचे आता मानले जात आहे.
आकार, वेग अन् शक्ती
हे क्षेपणास्त्र छोटे परंतु घातक आहे...
लांबी : 12 फूट (3.65 मीटर)
वजन : सुमारे 350 पाउंड (159 किलोग्रॅम)-सहजपणे लढाऊ विमानावर जोडता येणार
डायमीटर : 7 इंच (178 मिलिमीटर)-पातळ ट्यूबसारखा
विंगस्पॅन : 21 इंच (53 सेंटीमीटर) ए/बी वेरियंटएमध्ये
प्रोपल्शन : सॉलिड रॉकेट मोटर-बूस्ट सस्टेन टाइप-जो मोठा वेग प्रदान करतो
वेग : 4900 किलोमीटर प्रतितास
मारक पल्ला : 50-100 किलोमीटरहून अधिक-व्हिज्युअल रेंजबाहेर हल्ला
गायडेन्स सिस्टीम : अॅक्टिव रडार, इनर्शियल नेव्हिगेशन, मिडकोर्स अपडेट्स, जीपीएस