For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिका व्हेनेझुएलावर हवाई हल्ल्याच्या पवित्र्यात

06:36 AM Nov 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमेरिका व्हेनेझुएलावर हवाई हल्ल्याच्या पवित्र्यात
Advertisement

ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकन वृत्तपत्र ‘मियामी हेराल्ड’मधील एका वृत्ताने सध्या जगभरात खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलातील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा सदर वृत्तामध्ये करण्यात आला आहे. या हल्ल्यांचा उद्देश व्हेनेझुएलाच्या ड्रग्ज रॅकेटला संपवणे असा असून हे हल्ले काही तासांत किंवा दिवसांत सुरू होऊ शकतात, असे म्हटले आहे. तथापि, ट्रम्प प्रशासनाने याचा इन्कार केला आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने 30 ऑक्टोबर रोजी असाच एक अहवाल दिला असला तरी त्यात हवाई हल्ल्यासंबंधी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही असे म्हटले आहे.

Advertisement

‘मियामी हेराल्ड’ने 31 ऑक्टोबर रोजी ट्रम्प प्रशासनाने ‘सोल्स कार्टेल’ वापरत असलेल्या व्हेनेझुएलातील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कार्टेल ड्रग्ज तस्करीमध्ये सामील असून त्याचे नेते मादुरो आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या जवळचे आहेत. हे हल्ले कार्टेलच्या नेत्यांना मारण्यासाठी एकत्रित हवाई आणि नौदल कारवाईच्या स्वरुपात असतील. ही कार्टेल दरवर्षी युरोप आणि अमेरिकेत 500 टन कोकेन पाठवते,असे एका सूत्राने सांगितले.

Advertisement
Tags :

.