For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तीन चिनी कंपन्यांना अमेरिकेचा दणका

06:39 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
तीन चिनी कंपन्यांना अमेरिकेचा दणका
Advertisement

पाकिस्तानी क्षेपणास्त्र कार्यक्रमाला पाठिंबा देणाऱ्या कंपन्यांवर निर्बंध

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी तंत्रज्ञान पुरवणाऱ्या चीनच्या तीन कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली आहे. या यादीत बेलारूसमधील एका कंपनीचाही समावेश आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. कारवाईचा एक भाग म्हणून कंपन्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांना देशात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या आर्थिक विभागालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले.

Advertisement

बंदी घालण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये चीनच्या शियान लाँगडे टेक्नॉलॉजी, टियांजिन क्रिएटिव्ह सोर्स, ग्रॅनपेक्ट कंपनी आणि बेलारूसची मिन्स्क व्हील ट्रॅक्टर प्लान्ट यांचा समावेश आहे. बेलारशियन कंपनी मिन्स्क व्हील्स पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी चेसिस उपकरणांचा पुरवठा करत असे. टियांजिन कंपनीने पाकिस्तानला पुरवलेले साहित्य स्पेस लॉन्च व्हेईकलच्या टाक्मया वेल्डिंगमध्ये वापरले जाते. ग्रॅनपेक्ट कंपनीची उपकरणे पाकिस्तानच्या रॉकेट मोटर्सच्या चाचणीसाठी वापरली जातात.

पाकिस्तानने 1986-87 मध्ये हत्फ क्षेपणास्त्र कार्यक्रम सुरू केला होता. भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला तोंड देण्यासाठी पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या नेतृत्वाखाली याची सुऊवात झाली होती. या कार्यक्रमात पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाला लष्कराचा थेट पाठिंबा होता. या अंतर्गत पाकिस्तानने प्रथम हत्फ-1 आणि नंतर हत्फ-1 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ‘हत्फ-1’ क्षेपणास्त्र 80 किमीच्या रेंजवर मारा करण्यास सक्षम होते. तर ‘हत्फ-2’ क्षेपणास्त्र 300 किमीच्या रेंजवर मारा करण्यास सक्षम होते. ही दोन्ही क्षेपणास्त्रे 90 च्या दशकात लष्कराचा भाग बनली होती. 1996 मध्ये पाकिस्तानने चीनच्या मदतीने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान घेतले. त्यानंतर 1997 मध्ये हत्फ-3 ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्याची रेंज 800 किलोमीटरपर्यंत होती. 2002 ते 2006 या काळात भारतासोबतच्या तणावादरम्यान पाकिस्तानने सर्वाधिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली.

Advertisement
Tags :

.