महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकेच्या राजदूतांचा अरुणाचल दौरा

06:45 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चीनचा होणार जळफळाट : बिडेन प्रशासनाने स्वत:ची चूक सुधारली

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी सोशल मीडिया अकौंटवर अनेक छायाचित्रे शेअर केली असून ती चीनला बोचणारी ठरणार आहेत. अध्यक्ष जो बिडेन यांचे निकटवर्तीय एरिक गार्सेटी यांनी ही छायाचित्रे अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असताना काढली आहेत. चीनकडून अरुणाचल प्रदेशवर दावा सांगण्यात येत असतो.

हा माझा अरुणाचल प्रदेशसाठीचा पहिला दौरा असल्याचे म्हणत गार्सेटी यांनी ‘ भारत आणि अमेरिका साथ-साथ’ असे नमूद केले आहे. चीनच्या सीमेनजीकचे छायाचित्र पोस्ट करत अमेरिकेच्या राजदूतांनी आम्ही भारतासोबत उभे असल्याचा संदेश ड्रॅगनला दिला असल्याचे मानले जात आहे.

अरुणाचल प्रदेशच्या पहिल्या दौऱ्यावरून अत्यंत उत्साही आहे. येथील लोकांच्या उत्साहपूर्ण वर्तनामुळे मी भारावून गेलो आहे. पासीघाटचा परिसर अत्यंत थक्क करून सोडणारा असल्याचे गार्सेटी यांनी म्हटले आहे. छायाचित्रांमध्ये गार्सेटी हे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासोबत दिसून येत आहेत.

पाकिस्तानातील अमेरिकेच्या राजदूताने पाकव्याप्त काश्मीरचा दौरा करत त्याला आझाद काश्मीर असे संबोधिले होते. तसेच अमेरिकन सिनेटर इल्हान उमरने इम्रान खान यांच्या निमंत्रणावर पीओकेचा दौरा केला होता आणि भारताविरोधात गरळ ओकली होती. पीओकेसंबंधी केलेल्या आगळीकीनंतर अमेरिकेच्या राजदूताने अरुणाचल प्रदेशात जात स्वत:ची चूक सुधारल्याचे मानले जात आहे.

अमेरिकेच्या राजदूतांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीन भडकणार हे निश्चित आहे. चीन आणि पाकिस्तान दोन्ही देश भारताविरोधात टू फ्रंट वॉरला बळ देत आहेत. चीनने यापूर्वी अरुणाचल प्रदेशातील विदेशी महनीयांच्या दौऱ्याला विरोध दर्शविला आहे.

चीन अरुणाचल प्रदेशाला दक्षिण तिबेट  ठरवून त्यावर अधिकार दर्शवू पाहत आहे. चीनने अलिकडेच अरुणाचल प्रदेशच्या सीमेनजीक एक मोठे संमेलन आयोजित केले होते, ज्यात पाकिस्तानी विदेशमंत्र्यांनी भाग घेतला होता. चीन सातत्याने अरुणाचल प्रदेश सीमेनजीक मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रs तैनात करत आहे. चीनने अरुणाचल सीमेनजीक अनेक हवाईतळ देखील निर्माण केले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article