उर्विल पटेलच्या 37 चेंडूत नाबाद 119, गुजरात विजयी
वृत्तसंस्था / हैदराबाद
कर्णधार उर्विल पटेलने षटकारांसह नाबाद 119 धावा पटकावत गुजरातने बुधवारी येथे झालेल्या ग्रुप सी सामन्यात सर्व्हिसेसचा आठ गड्यांने पराभव केला आणि सय्यद मुश्ताक अली चषक मालिकेत धमाकेदार सुरूवात केली.
टी-20 कर्णधार म्हणून पदार्पण करणाऱ्या पटेलने सर्व्हिसेसच्या आक्रमणाची ख्ल्ली उडविली. 37 चेंडूच्या त्याच्या वादळी हल्ल्यात 12 चौकार आणि 10 षटकार मारले. चेन्नई सुपर किंग्जने राखलेल्या 27 वर्षीय खेळाडूने फक्त 31 चेंडूत शतक पूर्ण केले. हे भारतीय संघाचे दुसरे सर्वात जलद टी-20 शतक आहे. पटेल आणि अभिषेक शर्मा यांच्याकडे संयुक्तपणे भारतीय संघाकडून सर्वात जलद टी-20 शतकाचा विक्रम आहे. त्यांनी 2024-25 च्या आवृत्तीत अनुक्रमे त्रिपुरा आणि मेघालय विरुद्ध 28 चेंडूत हे शतक पूर्ण केले होते. 2023 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमम्ध्ये पटेलने चंदीगडविरुद्ध 41 चेंडूत शतक ठोकले होते. यष्टीरक्षक फलंदाजाने आर्य देसाई 35 चेंडूत 60), सोबत 174 धावांची दमदार भागीदारी करत जिमखाना मैदानावर 183 धावांचे लक्ष्य केवळ 12.3 षटकात पूर्ण केले.
तत्पूर्वी, फलंदाजीला पाठवलेल्या सर्व्हिसेसने 9 बाद 182 धावा काढल्या. सलामीवीर गौरव कोचरने 37 चेंडूत सर्वाधिक 60 धावाकाढल्या आणि सात चौकार आणि दोन षटकार ठोकले. विकेट नियमितपणे पडत असल्याने त्यांचा डाव कधीच यशस्वी झाला नाही. अर्जन नागवासवाला 38 धावांत 2 गडी तर हेमांत पटेल 2 बाद 21 धावा दिल्या.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर, पंजाबने हिमाचल प्रदेशवर पाच विकेटने विजय मिळवून आपल्या मोहीमेला सुरूवात केली. गोलंदाजीचा निर्णय घेत पंजाबने एचपीला 8 गडी बाद 147 धावांवर रोखले. इनेश महाजन 33, आणि निखिल गंगटाने 35 यांच्यासह कोणत्याही फलंदाजला सुरूवात बदलता आली नाही. हरप्रीत ब्रारने 2-14, गुरनूयर ब्रार 2 गडी घेवून 32 धावा दिल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाबने अनमोलप्रीत सिंगने 43 आणि सलील अरोराने 36 धावांची खेळ केली. 13.5 षटकांत 5 बाद 153 धावा केल्या.
ग्रुप सीच्या दुसऱ्या सामन्यात पुडुचेरीने हरियाणाचा 5 धावांनी पराभव केला. हरियाणाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शीर्ष आणि मधल्या फळीतील फलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर, पौगजेंडी आकाशने 23 चेंडूत 60 धावा केल्या आणि पुडुचेरीने 9 बाद 201 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना सलामीवीर अर्श रंगाने 47 चेंडूत 90 धावा आणि यशवर्धन दलालने 31 चेंडूत 52 धावा करुनही हरियाणाला सहा बाद 196 धावाच करता आल्या. कर्णधार अमन खान 4-28 हा सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला.
संक्षिप्त धावफलक: गुजरात 12.3 षटकांत 183/2 (उर्विल पटेल 119 नाबाद, मोहीत राठी 2-39), 20 षटकांत सर्व्हिसेसचा 182/9 (गौरव कोचर 60, अर्जन नागवासवाला 2-38, हेमांग पटेल 2-21).
पंजाबने 13.5 षटकांत 153/5 (अनमोलप्रीत सिंग 43, वैभव आरोरा 2-23) हिमाचल प्रदेश 20 षटकात 147/8 (इनेशन महाजन 33, निखिल गंगटा 35, हरप्रीत ब्रार 2-14).
पुडुचेरीने 20 षटकांत 9 बाद 201 धावा (पौगजेंडी आकाश 60, निशांत सिंधू 2-28), हरियाणा 20 षटकांत 6 बाद 196 धावा (अर्श रांगा 90, अमन खान 4-28).