For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उर्वशी रौतेलाला मिळाला बिगबजेट चित्रपट

06:49 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
उर्वशी रौतेलाला मिळाला बिगबजेट चित्रपट
Advertisement

‘अॅनिमल’नंतर बॉबी देओल आता लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबत दिसून येणार आहे. बॉबी देओल हा ‘एनबीके 109’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात या दोघांसोबत अभिनेता सलमान दुलकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातील मुख्य नायिका म्हणून हिंदी अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे.

Advertisement

रविंद्र बॉबी यांच्या दिग्दर्शनात निर्माण होणारा चित्रपट एनबीके 109 मध्ये अॅक्शनदृश्यांची भरमार असणार आहे. या चित्रपटात उर्वशी रौतेला ही नंदमुरी बालाकृष्णन यांची नायिका म्हणून काम करणार आहे. या चित्रपटाचे बजेट 300 कोटीच्या आसपास असणार आहे. या चित्रपटात गौतम वासुदेव मेनन देखील दिसून येणार आहे.

काही आठवड्यांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर निर्मात्यांकडून सादर करण्यात आले होते. नंदमुरी  बालकृष्ण यांचा हा चित्रपट अॅक्शनपट असणार आहे. या चित्रपटात बॉबी देओल खलनायकाची भूमिका साकारत आहे. तर उर्वशी रौतेलासाठी हा चित्रपट दक्षिणेत स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी मोठी संधी असल्याचे मानले जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.