For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘उर्फी के भाई’

06:26 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘उर्फी के भाई’
Advertisement

‘उर्फी जावेद’ नामक मॉडेल तिच्या चित्रविचित्र वेषभूषेशाठी प्रसिद्ध आहे. अनेकजण तिच्यावर अशा वेषभूषेसंदर्भात टीकाही करतात. पण तिने आपली ही सवय सोडलेली नाही. तिच्यापासूनच स्फूर्ती घेऊन की काय, पण काही पुरुषही इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विचित्र प्रकारची आणि अपुरी वेषभूषा करु लागले आहेत, असे दिसून येत आहे. अशा पुरुषांना पाहण्यासाठी महिलाही उत्सुक असल्याचे पहावयास मिळत आहे. या पुरुषांना ‘उर्फी के भाई’ म्हटले जात आहे.

Advertisement

सध्या अशा प्रकारचा एक व्हिडीओ वेगाने प्रसिद्ध होत आहे. काही युवक जांभळ्या रंगाचा, बरीचशी छाती उघडी टाकणारा बनियन, आणि खाली मांड्यांच्याही वर येणारा दुपट्टा परिधान करुन भर बाजारात हिंडताना दिसून येतात. अशा अर्धवस्त्र पुरुषांना पाहण्यासाठी महिलाही गर्दी करताना दिसतात. या युवकांनी डोळ्यांवर काळा चष्मा लावलेला दिसून येतो. अशा वेषभूषेतील या दोन युवकांना पाहून मार्गावरील महिला आणि तरुणी हसताना दिसून येतात. बाजारातली प्रत्येकाची दृष्टी (मग तो पुरुष असो की महिला) त्यांच्यावर पडल्याखेरीज रहात नाही. हा व्हिडीओ मनोरंजनाच्या उद्देशाने बनविला आहे, असे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. या अर्धवस्त्र तरुणांना ‘उर्फी के भाई’ हे नाव हा व्हिडीओ पाहिलेल्यांपैकी काहींनी त्यांच्या टिप्पण्यांमध्ये दिलेले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.