महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘उरस’ने शोधली तीन तेलगळतीची ठिकाणे

12:21 PM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तिन्ही ठिकाणी तीन किलोमीटरच्या पट्ट्यात : ठिकाणांच्या शोधानंतर खोदकामाला सुरुवात,माटवे दाबोळीतील तेलगळती प्रकरण

Advertisement

वास्को : माटवे दाबोळीतील इंधन गळतीचे ठिकाण शोधून काढण्यासाठी पंजाबमधून खास पाचारण करण्यात आलेल्या ‘उरस’ या श्वानाने काल गुरुवारी सकाळपासून जवळपास 3 किलो मिटर अंतराच्या पट्ट्यात तीन ठिकाणांवर संशय व्यक्त केलेला असून या कामातील पथकाने त्या ठिकाणी खोदकामही सुरू केलेले आहे. मात्र, संध्याकाळपर्यंत या कामात विशेष प्रगती झाली नव्हती. लवकरच इंधन गळतीचा शोध लागेल अशी आशा आहे. आता गळती शोधून काढण्याची जबाबदारी उरस या श्वानावर येऊन पडलेली आहे. मागच्या रविवारी माटवे दाबोळीतील विहीरींमध्ये पेट्रोल मिसळल्याचे व विहीर पेट घेत असल्याचे आढळून आल्याने वास्कोत खळबळ माजली होती. या घटनेला आता दहा दिवस उलटून गेलेले आहेत. सतत आठ दिवस जवळपास दहा किलो मिटर अंतराची वाहिनी खोदूनही या कामात गुंतलेल्या पथकाला गळती आढळून आली नाही.

Advertisement

 उरसने शोधली तीन ठिकाणे

गळतीचे ठिकाण शोधून काढण्यासाठी पंजाबहून उरस नाव असलेल्या श्वानाला थेट सांकवाळमध्ये आणण्यात आले आहे. या श्वानाने आपल्या कामालाही सुरूवात केली आहे. या श्वानाने सांकवाळमधील बिटस् पिलानी गोवा कॅम्पसपासून दाबोळीतील रेल्वे क्रॉसिंगपर्यंत तीन ठिकाणी संशयाची सुई दाखविली आहे. हे अंतर जवळपास 3 किलोमीटर आहे. गळती शोधण्यासाठी नेमलेल्या या पथकाने श्वानाने संशय व्यक्त केलेल्या ठिकाणी गुऊवारपासून खोदकामालाही प्रारंभ केला आहे. मात्र, अद्याप या कामात विशेष प्रगती झालेली नाही.

कोण आहे हे ‘उरस’ श्वान?

मिळालेल्या माहितीनुसार उरस हे श्वान भूमीगत इंधन वाहिनीतील गळतीचा शोध घेण्यात तज्ञ असून उत्तर भारतात या श्वानाने अशा प्रकारची कामगीरी बजावलेली आहे. या श्वानाला विमान किंवा ट्रेनने आणणे शक्य नसल्याने खास वाहनातून सांकवाळपर्यंत आणण्यात आले आहे. पंजाब ते गोवापर्यंत या श्वानाने 72 तासांचा प्रवास केलेला आहे. त्याच्यासोबत प्रशिक्षकही आहेत. या श्वानाच्या निवासाची खास व्यवस्थाही झेडआयएव्ही लि. कंपनीने केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article