कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फिंगरप्रिंटमध्ये युपीआय पेमेंट होणार शक्य

06:26 AM Jul 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लवकरच नवी सुविधा उपलब्ध होणार : आता चोरीच्या घटना होणार कमी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

युपीआय वापरकर्ते लवकरच फेस किंवा फिंगरप्रिंटद्वारे पेमेंट करू शकतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युपीआय चालवणारी एजन्सी एनपीसीआय, बायोमेट्रिक्सद्वारे पेमेंट सुलभ करण्याची तयारी करत आहे. यानंतर युपीआय पेमेंट करण्यासाठी पिनची आवश्यकता पर्यायी होईल.

या नवीन योजनेबाबत जाणून घेऊया

1: बायोमेट्रिक पेमेंट म्हणजे काय?

बायोमेट्रिक पेमेंटमध्ये, ओळख फिंगरप्रिंट, फेस आयडी सारख्या अद्वितीय भौतिक वैशिष्ट्यांद्वारे होईल. हा पिन या पासवर्डपेक्षा सुरक्षित आणि सोपा आहे, कारण तो कॉपी करणे कठीण आहे. जसे की तुम्ही फिंगरप्रिंट आणि फेस आयडीद्वारे तुमचा स्मार्टफोन अनलॉक करू शकता.

2.ही सुविधा कधी सुरू होईल?

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआय या अपडेटवर काम करत आहे. त्यांना युपीआय पेमेंट अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर हवे आहेत. हे अपडेट काही महिन्यांत युपीआय अॅप्समध्ये दिसू शकेल.

3.बायोमेट्रिक पेमेंट कुठे आहे?

बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनमध्ये पिनच्या तुलनेत फसवणुकीचा धोका कमी आहे. ही प्रणाली जलद आणि सोपी असेल. विशेषत: ज्यांना पिन लक्षात ठेवणे कठीण वाटते त्यांच्यासाठी.

4: सर्व युपीआय अॅप्समध्ये हे वैशिष्ट्या असेल का?

हो, गुगल पे, फोनपे, पेटीएम सारख्या सर्व प्रमुख युपीआय अॅप्सना ते सपोर्ट करू शकते. परंतु सुरुवातीला, काही निवडक अॅप्समध्ये पायलट चाचणी असू शकते.

5: ही प्रणाली सुरक्षित आहे का?

हो, बायोमेट्रिक डेटा एक्रिप्ट केला जाईल आणि संग्रहित केला जाईल, ज्यामुळे डेटा चोरीचा धोका कमी होईल. परंतु डेटा गोपनीयतेसाठी मजबूत सुरक्षा आवश्यक राहणार असल्याची माहिती आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article