मेगाथर्म इंडक्शनचा येणार आयपीओ
कंपनी 53 कोटी रुपये उभारणार
मुंबई :
मशिनरी बनवणारी मेगाथर्म इंडक्शन लिमिटेड या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारामध्ये 25 जानेवारीला खुला होणार आहे. या आयपीओकरिता कंपनीने 100 -108 रुपये प्रति समभाग अशी किंमत निश्चित केली आहे.
सदरचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 30 जानेवारीपर्यंत खुला राहणार आहे. या आयपीओ अंतर्गत 49 लाख नव्या समभागांची विक्री केली जाणार आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनी 53 कोटी रुपये उभारणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एका लॉटमध्ये बाराशे समभाग खरेदी असणार आहेत. गुंतवणूकदारांना किमान 200 समभागांसाठी बोली लावता येणार आहे.
या आयपीओतून उभारलेली रक्कम कारखाना उभारणी आणि अतिरिक्त कारखाने तसेच मशिनरीच्या स्थापनेकरिता वापरली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मेगाथर्म इंडक्शन लिमिटेड यांचा समभाग 2 फेब्रुवारी रोजी बाजारात लिस्ट होणार असल्याची माहिती आहे.