सेन्सेक्स-निफ्टी यांचे निर्देशांक कोसळले
सेन्सेक्स 1,190 अंकांनी नुकसानीत : जागतिक बाजाराचा प्रभाव
मुंबई : चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात भारतीय भांडवली बाजार घसरणीसह बंद झाला आहे. यामध्ये मागील काही दिवसांपासून जागतिक पातळीवर विविध घडमोडींसह अन्य राजकीय वातावरणामुळे भारतीय बाजारातील वातावरण अस्थिर राहिले आहे. याचाच परिणाम म्हणून गुरुवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक नुकसानीसोबत बंद झाले आहेत. गुरुवारच्या सत्रात जागतिक पातळीवरील बाजारांमधील नकारात्मक संकेत आणि महिना अखेरचा फ्यूचर्स अॅण्ड ऑप्शन्स यांच्या समाप्तीमुळे बाजारात दबाव राहिला. यामुळे मोठ्या घसरणीसह दोन्ही निर्देशांक बंद झाले आहेत. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 1,190 अंकांनी कोसळून निर्देशांक 1.48 टक्क्यांसोबत 79,043.74 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 360.75 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 1.49 टक्क्यांसह 23,914.15 वर बंद झाला.
या कारणांमुळे आली घसरण
रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये ऊर्जा नियोजन आणि ड्रोनच्या द्वारे करण्यात येणाऱ्या हल्ल्यामुळे भू राजकीय तणाव निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून बाजारात नकारात्मक स्थिती राहिली आहे. यासोबत फ्यूचर्स अॅण्ड ऑप्शन्सचा महिनाअखेर यांच्याशी संबंधीत विक्रीमुळे बाजारामध्ये नकारात्मकता राहिली. मुख्य कंपन्यांमध्ये निफ्टीमधील 50 मधील 46 कंपन्या प्रभावीत राहिल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक नुकसानीत एसबीआय लाईफ, इन्फोसिस, एचडीएफसी लाईफ, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि अदानी पोर्ट यांचा समावेश होता. दुसरीकडे अदानी एंटरप्राईजेस, श्रीराम फायनान्स, स्टेट बँक आणि सिप्ला सारख्या समभागांमध्ये 1.63 टक्क्यांची काहीशी तेजी राहिली.
मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये हलकी तेजी
शेअर बाजारामध्ये निफ्टीत मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 0.05 टक्क्यांच्या वाढीसोबत बंद झाले.
आयटी क्षेत्र सर्वाधिक दबावात
मुख्य क्षेत्रांमध्ये आयटी क्षेत्र सर्वाधिक नुकसानीत राहिले.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- अदानी एंटरप्रायझेस 2437
- श्रीराम फायनान्स 3043
- एसबीआय 838
- सिप्ला 1492
- एक्साइड इंडस्ट्री 457
- एल अँड टी फायनान्स 144
- इंटरग्लोब एव्हिएशन 4352
समभाग घसरलेल्या कंपन्या
- एसबीआय लाइफ 1428
- इन्फोसिस 1856
- महिंद्रा आणि महिंद्रा 2898
- एचडीएफसी लाइफ 657
- बजाज फायनान्स 6509
- अदानी पोर्टस् 1167
- एचसीएल टेक 1840
- टेक महिंद्रा 1713
- टायटन 3212
- आयशर मोटर्स 4815
- अपोलो हॉस्पिटल 6841
- टीसीएस 4244
- टाटा कन्झ्यु. 941
- एनटीपीसी 362
- ग्रासिम 2570
- बजाज ऑटो 9013
- विप्रो 572
- हिरो मोटोकॉर्प 4783
- रिलायन्स 1270
- नेस्ले 2236
- पॉवरग्रिड कॉर्प 333
- हिंडाल्को 650
- बजाज फिनसर्व्ह 1575
- जेएसडब्ल्यू स्टील 954
- ट्रेंट 6743
- अॅक्सिस बँक 1132
- एशियन पेंटस् 2458
- कोटक महिंद्रा 1759
- अल्ट्राटेक सिमेंट 10997
- ब्रिटानिया 4923
- आयसीआयसीआय बँक 1286
- भारती एअरटेल 1560
- एचडीएफसी बँक 1793
- एचयुएल 2462
- मारुती सुझुकी 10949